Alia Ranbir Kapoor
Alia Ranbir Kapoor Twitter
मनोरंजन

आलिया माझ्या आयुष्यातला दाल तडका, आता मला हाक्का नूडल्सची गरज नाही: रणबीर कपूर

दैनिक गोमन्तक

Shamshera Trailer Launch Event: दीर्घ विश्रांतीनंतर रणबीर कपूर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या वर्षी रणबीर कपूरचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एक अयान मुखर्जीचा 'बोह्मास्त्र' आणि दुसरा करण मल्होत्राचा 'शमशेरा', ज्याचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. शमशेराचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता जिथे रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आले होते. यावेळी रणबीर कपूरने मीडियाच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. रणबीरने अगदी त्याच्या लग्नाबद्दल आणि आलिया भट्टबद्दलही दिलखुलास संवाद साधला. (Ranbir On His Married Life)

चित्रपटाला उशीर का झाला...

मीडिया संवादादरम्यान रणबीरने सांगितले की, तो त्याच्या वैवाहिक जीवनात किती आनंदी आहे आणि आलियासोबत हा आनंद भरभरून जगत आहे. 'तुम्ही पाहू शकता की या बिग बजेट चित्रपटात व्हीएफएक्सचाही वापर करण्यात आला आहे, त्यामुळे असे चित्रपट बनवायला वेळ लागतो. मग याच दरम्यान कोविडही आला होता. मला कळत नाही की याला नशिब म्हणावे ती दुर्दैव. माझे दोन्ही चित्रपट जवळपास 45 दिवसांच्या अंतराने प्रदर्शित होत आहेत.'

आलिया माझ्यासाठी सगळं काही

पुढे बोलतांना रणबीरने अलियाचं त्याच्या आयुष्यातल महत्व अधोरेखित केलं. 'चित्रपटांव्यतिरिक्त हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं, या वर्षी माझं लग्न झालं. मी माझ्या चित्रपटात म्हणायचो की लग्न म्हणजे दाल चावल असते. आयुष्यात काही तंगडी कबाब, कीमा पाव, हक्का नूडल्स असाव्यात. पण आता आयुष्यातील अनुभवानंतर ही दाल चावलच खुप बेस्ट आहे यापेक्षा काही चांगलं नाही असं मला आज वाटते, आलियाचं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे दाल चावला तडका देण्यासारख आहे. आलियापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरा चांगला जोडीदार मी मागूच शकत नाही, असं माध्यमांशी बोलतांना रणबीरने हसत हसत सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

SCROLL FOR NEXT