पाकिस्तान सिनेसृष्टीला अखेरची घरघर

चित्रपटगृहांची वीज बिलेही थकीत असल्याची स्थिती
Pakistan Cinema Crisis
Pakistan Cinema CrisisDainik Gomantak

पाकिस्तानमध्ये सिनेसृष्टी संकटात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती सध्याच्या घडीला इतकी बिकट आहे की, चित्रपटगृहांची वीज बिलेही थकीत आहेत. प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाट फिरवल्याने चित्रपटगृहांना विजबिलाचे पैसे ही चुकते करणे शक्य झालेले नाही. हॉलिवूड चित्रपटांच्या बहाण्याने चित्रपटांचा व्यवसाय थोडासा चालला आहे, पण चित्रपटगृहांचा खर्च निघेल इतका नाही. त्यामूळे पाकिस्तानच्या चित्रपट सृष्टीला अखेरची घरघर लागली आहे. असे पाकिस्तानच्या एका स्थानिक प्रसार माध्यमाने सांगितले आहे. (pakistan cinema crisis theatres have pending electricity bills )

Pakistan Cinema Crisis
Shamshera Trailer च्या रोचक गोष्टी वाचुन चाहत्यांची वाढेल चित्रपट पाहण्याची उत्सुकता

पाकिस्तानातील कलाकार सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसत नसले तरी भारतात त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय प्रेक्षक कुठूनही तिथले नाटक शोधण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न करत असतात. असे चित्र असले तरी नव निर्मीतीसाठीचा खर्च आणि होणारा नफा यात मोठी तफावत असल्याने ही वेळ आली असल्याची ही पाकिस्तानी माध्यमे स्पष्ट करताना दिसत आहेत.

Pakistan Cinema Crisis
'शमशेरा' ट्रेलरच्या लॉंच ठिकाणी जातांना रणबीर कपूरच्या कारला अपघात

पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनच्या अहवालात असे म्हटले आहे की, कपरी सिनेमा, कराचीतील लोकप्रिय थिएटर, चित्रपट दाखवण्याची नवीन प्रणाली घेऊन आली आहे. सिस्टीम अशी आहे की, या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये फक्त वीकेंडच्या दिवशीच चित्रपट चालतील. यामागचे थेट कारण म्हणजे पाकिस्तानी जनता चित्रपटगृहांकडेही वळत नाही. वीकेंडला अजूनही लोक थिएटरमध्ये दिसतात, परंतु आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये शांतता असते.

कोविड-19 नंतर सिनेसृष्टीला लागली उतरती कळा

कोविड-19 नंतर, पाकिस्तान सरकारने पुन्हा थिएटर उघडण्यास परवानगी दिली, तेव्हा थिएटर मालकांना शटर उचलायचे नव्हते. पाकिस्तानमध्ये बॉलिवूड चित्रपटांचे शो बंद झाल्यापासून चित्रपटांचे वितरक, निर्माते आणि थिएटर मालक यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. कोविड-19 मुळे चित्रपटगृहे वारंवार बंद होत असल्याने प्रकरण आणखी चिघळले. मात्र, व्यवसाय अजिबात ठप्प झाला आहे, असे नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com