Sheezan Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Tunisha Sharma Suicide : शीजान खानच्या 4 मागण्या कोर्टाकडुन मंजूर; काय आहेत या मागण्या?

तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणात आरोपी शीजान खानने कोर्टाकडे केलेल्या मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत

Rahul sadolikar

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी आता हळूहळू काही गोष्टी समोर येत आहेत. सध्या वसई कोर्टात ही केस सुरू असुन आज कोर्टाचा एक निर्णय समोर आल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयात आरोपी शीजान खानच्या चार मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.काय आहेत या मागण्या ?

या प्रकरणात आरोपी शीजान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. कोर्टात शीजान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी कोर्टाकडे मांडलेल्या 4 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. माध्यमांशी बोलताना शीजान खानचे वकील मिश्रा म्हणाले पोलिसांनी सुरूवातीला शीजान खानची रिमांड मागितली होती पण कोर्टाने न्यायालयीन कोठडीचा निर्णय दिला आहे.

कोर्टाकडे मागितलेल्या चार मागण्यांपैकी एक मागणी ही होती शीजानला घरचं जेवण मिळावं ही होती त्याचबरोबर शीजान खानला औषधांची सुद्धा परवानगी सुद्धा कोर्टाने दिली आहे. शीजान खानला अस्थमा असल्याने त्याला इनहिलर वापरण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.गेले काही दिवस तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषद घेऊन शीजान खान आणि त्याच्या कुटूंबावर गंभीर आरोप केले होते. शीजानच्या कुटूंबाकडुन तुनिषाच्या धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता, असा धक्कादायक आरोप करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Zilla Panchayat Election: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत 80% नव्‍या चेहऱ्यांना संधी! दामू नाईक यांची माहिती; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मोबाईलचा तपास अजूनही नाहीच...

Goa Live News: मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या 8 पाल्यांना शासकीय नोकरी प्रदान

Cuncolim Liquor Case: 2 महिने उभा होता संशयास्पद ट्रक, आत होती 57 लाखांची दारू; मुख्य संशयित अजूनही गायब

..त्याला 'गोव्यात' यायचे होते, अमेरिकेत झाला स्थानबद्ध! पोर्तुगाल पासपोर्ट असून 'दिल्ली'त केले हद्दपार; काय झाले नेमके? वाचा

SCROLL FOR NEXT