Numerology for 2023 : नव्या वर्षात बॉलिवूडला नुकसान, पण शाहरुखला धोका नाही..ज्योतिषांचा अंदाज

नव्या वर्षात बॉलिवूडचं आणखी नुकसान होणार पण शाहरुखला मात्र काही धोका नाही असं ज्योतिषांनी सांगितलं आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

2022 संपायला अवघे काही तास उरलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना सरत्या वर्षाला निरोप देताना नवं वर्ष कसं असणार आहे याविषयीही लोकांमध्ये उत्सुकता असणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी हे वर्ष कसं असणार आहे? याविषयी आता भविष्यवाणी वर्तवण्यात येऊ लागली आहे.

बॉलिवूडसाठी येणारं 2023 साल कसं असणार आहे याविषयीही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. हे वर्ष बॉलीवूडसाठी नुकसानदायक असणार आहे पण अभिनेता शाहरुख खानसाठी मात्र हे वर्ष चांगलं जाणार असल्याची भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

2023 ची बेरीज 7 होते. याचा अर्थ असा की यावर्षी केतू ग्रह असणारे राज्य करणार अशी भविष्यवाणी न्यूमरोलॉजिस्ट भाविक सांघवी यांनी केली आहे. 7 नंबर खुपच क्रियेटिव्ह, मूडी आणि आर्टिस्टिक असल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळं ज्या स्टार्सचा जन्मदिनांक 1,2,4,7 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं जाणार अशी भविष्यवाणी केली गेली आहे.

पुढे सांघवी यांनी कोणता अभिनेता 2023 साल गाजवणार? याबद्दल माहिती दिली आहे. हे साल अभिनेता शाहरुख खान आणि कार्तिक आर्यन यांचं असणार आहे. सलमान खान आणि अक्षय कुमार यांना मात्र हे साल चांगलं जाणार नसल्याचं ही भविष्यवाणी सांगते.

Shah Rukh Khan
Aamir Khan : आमिर खानला आता केजीएफच्या दिग्दर्शकाचा आधार..पुढचा चित्रपट सोबत करणार

भविष्यवाणी पुढं असंही सांगते की हे साल कुठल्याही नायिकेसाठी महत्वाचं असणार नाही. राणी मुखर्जीसाठी चांगलं जाणार पण तिचा चित्रपट फारशी कमाई करणार नसल्याचं सांगितलं जातंय. यावर्षी थिएटरपेक्षा ओटीटीवर जास्त चालणार असंही सांघवी म्हणाले. 2022 साल बॉलिवूडसाठी चांगलं नव्हतं कित्येक मोठमोठे चित्रपट जोरात आपटले. त्यामुळे आता सांघवी यांची भविष्यवाणी खरी ठरणार की नाही हे 2023 मध्येच समजु शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com