2022 Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Controversies of 2022 : लाल सिंह चढ्ढा, पठाण.. यावर्षी बॉलिवूडमध्ये या गोष्टींमुळे झाला राडा..

बॉलिवूडने 2022 यावर्षी या गोष्टींमुळे वाद-विवाद ओढवले आहेत..

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड आणि वाद -विवाद हे समिकरण काही नवीन नाही. एखादा चित्रपट किंव त्यातले एखादे दृष्य यामुळे वाद होण्याची परंपरा बॉलिवूडला नवीन नाही. पण यावर्षी बॉलिवूडला बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला, याचा फटका अनेक कलाकारांना बसला. कोणत्या वादाने बॉलिवूड 2022 साली गाजलं चला पाहुया.

  • 1. 'द कश्मिर फाईल्स'

    दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची कश्मिर पंडितांच्या समस्येकडे लक्ष वेधणारी 'द कश्मिर फाईल्स' हा चित्रपट या वर्षी वादग्रस्त ठरला आहे. अतिशय कमी बजेटमध्ये बनवल्या गेलेल्या या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रचारकी असा शिक्काही काही गटाकडुन मारण्यात आला. गोव्यात इफ्फीच्या समारोपात इस्रायलचे ज्युरी नडाव लडाव यांच्याकडुन वल्गर चित्रपट असा शेराही मारण्यात आला ;पण दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आतापर्यंत चित्रपटाचा बचावच केला आहे.

  • रणवीर सिंह न्यूड फोटोशूट

    आपले अतरंगी कपडे आणि स्टाईलसाठी रणबीर सिंह नेहमीच चर्चेत असतो ;मात्र 2022 साली त्याची चर्चा जास्तच झाली कारण त्याने केलेलं न्यूड फोटोशूट. सोशल मिडीयावर या फोटोशूटची जोरदार चर्चा झाली कित्येकांनी रणवीरवर तो अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप केला. पण जर त्याला ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा फरक पडला तर मग तो रणवीर कसला?

  • अजय देवगन आणि किच्चा सुदिप

इंडस्ट्रीत 2022 साली बॉलिवूड आणि साऊथ सिनेमा अशी तगडी टक्कर बघायला मिळाली. एका बाजुला दक्षिनेतले सिनेमे कमाईचे डोंगर ऊभे करत होते तर दुसरीकडे बॉलिवूडची अवस्था वाईट झाली होती तर दुसऱ्या बाजुला सिंघम अजय देवगन आणि साऊथचा सुपरस्टार किच्चा सुदीप यांच्यात एक वाद उद्भवला. किच्चा सुदिप याने हिंदीच्या सक्तीला विरोध केला होता तर या त्याच्या भूमीकेवर अजय देवगनने आक्षेप घेतला होता.

  • सुकेश चंद्रशेखर आणि मनी लॉंड्रिंग

    2022 साल गाजलं ते सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे. या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचीही चौकशी झाली. त्यात सुकेश चंद्रशेखर याच्याबरोबर जॅकलिन फर्नांडिसचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते.

  • अक्षय कुमार पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन ट्रोल

    अभिनेता अक्षय कुमार हा आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. पण या वर्षी त्याने केलेल्या जाहिरातीवरुन अक्षय कुमार चांगलाच ट्रोल झाला आहे. पानमसाल्याची ही जाहिरात सुरूवातीला अजय देवगनने केली होती. त्यानंतर शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी ही जाहिरात केली पण लोकांना अक्षय कुमारने या जाहिरातीत काम करणं आवडलं नाही. यावर अक्षय कुमारने लोकांची माफीही मागितली होती.

  • लाल सिंह चढ्ढा

अभिनेता अमिर खान नेहमीच चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारा अभिनेता म्हणुन ओळखला जातो. यावर्षी अमिर खानचा लाल सिंह चढ्ढा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ;पण बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटाला मोठा फटका बसला. सोशल मिडीयावर अमिर खानला बॉयकॉट करा हा ट्रेंड खुप चालला. अमिरने देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. यासाठी त्याचं 2015 साली पत्नीसोबत देश सोडण्याच्या केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आलं. त्याचबरोबर त्याच्या पीके चित्रपटात हिंदु धर्माची चेष्टा केल्याचा आरोप करण्यात आला. अमिरने यावर माफीही मागितली पण त्याचा काहीही फायदा होऊ शकला नाही.

  • पठाण

शाहरुख खानचा आगामी पठाणचा वाद रिलीजच्या आधीच वादग्रस्त ठरला आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरुन मोठाच वाद निर्माण झाला या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या बिकीनीवरुन काही हिंदुत्ववादी संघटनांनी मोठा विरोध केला आहे. बिहार राज्यात तर शाहरुखसह 5 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एकंदरित 2022 हे वर्ष बॉलिवूडमध्ये अनेक वादांमुळे गाजलं...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT