In Real Love Controversy  Dainik Gomantak
मनोरंजन

In Real Love : "मला त्याने जबरदस्तीने किस केले" रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धकाच्या आरोपानंतर खळबळ

इन रिअल लव्ह या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एका स्पर्धकाने केलेल्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.

Rahul sadolikar

इन रिअल लव्ह हा रिअ‍ॅलिटी शो सध्या जोरदार चर्चेत आहे. एका स्पर्धकाने केलेल्या गंभीर आरोपानंतर मनोरंजन विश्वाच्या नजरा या शोकडे वळल्या आहेत.

OTT वर अनेक प्रकारचे शो दाखवले जातात, ज्यांचे प्रेक्षक वेगळ्या स्टाईलचे असतात . टेलिव्हिजन मालिकांपासून ते चित्रपट आणि रिअॅलिटी शो या प्लॅटफॉर्मवर दाखवले जातात. असाच एक शो आहे 'इन रियल लव्ह', जो सध्या एका वादामुळे चर्चेत आला आहे.

'इन रिअल लव्ह' हा रणविजय सिंघा आणि गौहर खान यांनी होस्ट केलेला नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये स्पर्धकांची एक जोडी तयार झाली आहे, जी ऑनलाइन डेटिंगशिवाय एकमेकांसोबत वेळ घालवतात. 

नुकताच या शोवर एका स्पर्धकाने दुसऱ्या स्पर्धकावर लावलेल्या आरोपांमुळे चर्चेत आला होता. साक्षी गुप्ता नावाच्या एका स्पर्धकाने आरोप केला आहे की, तिचे विना परवानगी चुंबन घेण्यात आले. या वादामुळे हा शो चर्चेत आला आहे.

'इन रियल लव्ह' या रिअॅलिटी शोच्या चौथ्या पर्वानंतर खळबळ उडाली आहे. वीरेंद्र नावाच्या स्पर्धकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप स्पर्धक साक्षी गुप्ताने केला आहे. तिच्या संमतीशिवाय तिच्या खांद्यावर जबरदस्तीने किस करण्यात आल्याचे साक्षीने म्हटले आहे. 

वास्तविक, साक्षी आणि वीरेंद्र एकमेकांसोबत वेळ घालवणार हे या शोमध्ये ठरले होते. दोघांचे बॉन्डिंग चांगले झाले तर ते आपले नाते पुढे नेतील. दोघेही पूल पार्टीला गेले होते, तेव्हा ही घटना घडली आहे.

पूल पार्टीमध्ये दोघांनी मद्यपान केले, मस्ती केली आणि काही वेळाने ही घटना घडली. साक्षीने सांगितले की, वीरेंद्रने न विचारता तिच्या खांद्यावर थोपटले आणि तिला ते आवडले नाही. ;पण ती मद्यधुंद होती, आणि म्हणून तिला जास्त आठवत नाही. मात्र ही बाब कळताच चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे दोघांमधील संबंधही तुटले. त्याचबरोबर साक्षीच्या आरोपानंतर वीरेंद्रची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

साक्षीच्या आरोपांवर वीरेंद्रनेही प्रत्युत्तर दिले आहे. तो म्हणाला, “तुम्ही कितीही नशेत असलात तरी त्या वेळी तुमचा मूड बदलू शकत नाही. त्यावेळी तुम्ही एका विशिष्ट प्रकारच्या मूडमध्ये असता. तुमचा हावभाव खूप काही सांगून जातो, तुम्ही काहीतरी करा आणि आता तुम्ही पूर्ण शुद्धीत आहात. मला चुकीचे दाखवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT