अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रिती झिंटा ट्रोल झाली आणि त्यानंतर तिने आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक व्हिडीओ व्हायरल केला. प्रितीने एका दिव्यांग व्यक्तीला पैसे न दिल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले.
पण प्रितीने आता या प्रकरणावर आपले मौन तोडले आहे आणि ट्रोलर्सवर ताशेरे ओढले आहेत, ज्यावर काही सेलिब्रिटींनी तिचे समर्थन केले आहे. यासोबतच प्रीतीने एका अनोळखी महिलेने तिच्या मुलीचे चुंबन घेतल्याची घटनाही सांगितली आहे.
प्रिती झिंटाने तिच्यासोबत घडलेल्या दोन घटनांचा व्हिडीओ शेअर करत संपूर्ण घटना सांगितली. यासोबतच तिला मदत करण्याऐवजी याचा व्हिडिओ बनवणाऱ्या पापाराझींवरही तिने नाराजी व्यक्त केली.
प्रितीने पोस्ट शेअर करत म्हटले आहे की तिची मुले कोणत्याही पॅकेज डीलचा भाग नाहीत किंवा ते कोणाचे बळी होण्यासाठी नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांना एकटे सोडले पाहिजे आणि त्यांना फोटो काढण्यासाठी किंवा स्पर्श करण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ नये.
अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर हृतिक रोशनपासून अर्जुन रामपालपर्यंत सर्वांनीच तिला पाठिंबा दिला आहे. प्रिती झिंटाने पुढे येऊन या गोष्टी सांगितल्याबद्दल हृतिक रोशनने तिचे कौतुक केले.
त्याचवेळी मलायका अरोरा म्हणाली की, तिने हे प्रकरण उघडपणे सर्वांसमोर ठेवले, जे कौतुकास्पद आहे. अर्जुन रामपालने प्रीती झिंटाला सांगितले की, पुढच्या वेळी असे काही घडले तर तिने त्याला फोन करावा. तो त्यांच्याशी सामना करेल
दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, 'आजच्या सोशल मीडियाच्या युगात नकारात्मकता अधिक पसरत आहे हे खरे आहे. सेलिब्रिटीही माणूसच असतात. त्यांचेही वैयक्तिक आयुष्य आहे, त्यामुळे त्यांना मोकळं सोडलं पाहिजे. एखाद्याला मदत करणे किंवा न करणे हा वैयक्तिक निर्णय आहे. कोणाला न्याय देणारे आम्ही कोण?
प्रीती झिंटाने लिहिले की, 'या आठवड्यात दोन घटना घडल्या ज्यांनी मला घाबरून सोडले. पहिली घटना माझी मुलगी जिया हिच्याशी संबंधित आहे. एका अनोळखी महिलेने तीचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही तिला प्रेमाने असे करण्यापासून अडवलं, म्हणून ती निघून गेली. मग अचानक परत आली आणि माझ्या मुलीला बळजबरीने आपल्या मिठीत घेतले आणि तोंडावर ओले चुंबन घेऊन पळून गेली.
याशिवाय एका अपंग व्यक्तीशी संबंधित आणखी एका घटनेचाही तिने उल्लेख केला. प्रितीने लिहिले, 'तुम्ही येथे दुसरी घटना पाहू शकता. मला विमान पकडायचे होते आणि हा अपंग माणूस मला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला. . माझ्याकडे पैसे असताना मी दिले. पण यावेळी त्यांनी विचारले, म्हणून माफ करा आज रोख रक्कम नाही, फक्त क्रेडिट कार्ड आहे,.
प्रितीने लिहिले की, 'माझ्यासोबत आलेल्या महिलेने त्याला तिच्या पर्समधून काही पैसे दिले तेव्हा तो आक्रमक झाला. ते पैसे पुरेसे नसल्याने त्याने महिलेच्या अंगावर फेकले. तुम्ही बघू शकता की तो माणूस काही काळ आमच्या मागे गेला. त्याला अजूनच राग आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.