Raju Srivastav Dainik Gomantak
मनोरंजन

Raju Srivastav Death: स्टॅंडअप कॉमेडियन राजू श्रीवास्त यांचे 59 व्या वर्षी निधन

Raju Srivastav Passed Away: आपल्या मजेदार जोक्सने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्त यांचे 59 व्या वर्षी निधन

दैनिक गोमन्तक

आपल्या मजेदार जोक्सने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्त (Raju Srivastav) यांचे 59 व्या वर्षी निधन झाले आहे. बुधवारी त्यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. 42 दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले.

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या कॉमेडियनला प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत आणि सर्वांना रडवून सर्वांना हसवणारा विनोदवीरने या जगाचा कायमचा निरोप घेतला.

मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं काम

राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतं. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT