Dr. Sanket Bhosale And Sugandhaa S Mishra 
मनोरंजन

'ग कोणी तरी येणार, येणार ग' कॉमेडियन सुगंधा होणार आई, गोव्याच्या किनारी बेबी बंपसह केले फोटोशूट

सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे.

Pramod Yadav

Dr. Sanket Bhosale And Sugandhaa S Mishra: गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्राने 15 ऑक्टोबर रोजी तिच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. सध्या ती प्रेग्नेंसीचा आनंद घेत असून, नुकतेच तिने सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी हे जोडपे खूपच उत्सुक दिसत आहे.

सुगंधा मिश्राने इन्स्टाग्रामवर पती संकेत भोसलेसोबतचे एक नव्हे तर अनेक फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. 15 ऑक्टोबर दिवस खूप खास असून, याच दिवशी नवरात्रीला सुरुवात झाली आहे.

'कोणीतरी लवकरच येत आहे. आम्ही स्वत:ला अजिबात रोखू शकत नाही. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा,' असे फोटो कॅप्शन तिने दिले आहे.

फोटोंमध्ये सुगंधा मिश्रा मरून रंगाच्या स्लिट गाऊनमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तर संकेत गुलाबी शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे.

सुगंधा मिश्रा आणि संकेत यांचे 2021 मध्ये लग्न झाले. कोरोनाच्या काळात दोघांनीही अत्यंत साधेपणाने लग्न केले. दोघेही अनेक वर्षांपासून चांगले मित्र होते आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्या खूप दिवसांपासून चर्चेत होत्या. आता लग्नाच्या दोन वर्षानंतर हे जोडपे आई-वडील होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: भारतातच नाही तर थेट बलोचमध्येही 'खन्नाची हवा'; दिग्गज नेते झालेत फॅन, म्हणाले "हा तर हुबेहूब..."

अग्रलेख: हडफड्याच्या अग्निकांडाचा उगम कझाकस्थानात? कझाकी नर्तिकेचं नृत्य नसतं तर क्लबला आग लागली नसती?

'बासमती' नुसता बहाणा! ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीमागे अर्थकारण कमी, अहंकारच अधिक - संपादकीय

Amazon Investment In India: भारतात 35 अब्ज डॉलर गुंतवणूक, अमेझॉनची घोषणा; देशात 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार

Goa Live News: "मी फक्त 'गुंतवणूकदार"- 'बर्च'चा भागीदार अजय गुप्ताचा दावा

SCROLL FOR NEXT