माजी खासदाराच्या मुलावर खंडणी, गोळीबाराचा गुन्हा; गोव्याला पलायन करण्याचा प्लॅन फसला, तिघांना अटक

नाकाबंदीदरम्यान रामगंजमंडी पोलिसांची कारवाई
Arrest
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

Bihar: बिहारचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याच्यासह सलमान उर्फ ​​सैफ आणि वसीम यांना रामगंजमंडी पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी कलम 151 अन्वये तिघांना अटक केली आहे.

बिहारमधील सिवानमध्ये ओसामा आणि सलमानविरुद्ध खंडणी, जमिनीची मागणी, धमकावणे आणि गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तेव्हापासून दोघेही फरार होते.

बिहारमधून तिघे आरोपी कारने गोव्याच्या दिशेने जात होते. कोटा येथून झालावाडच्या दिशेने नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

उंडवा येथे नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी सुरू होती. तिन्ही आरोपी सध्या रामगंज मंडी कारागृहात आहेत. पोलीस सध्या तिघांचीही कसून चौकशी करत आहेत.

बिहारमध्ये गुन्हा करून ओसामा फरार व्हायच्या तयारीत होता, पोलिसांना माहिती मिळताच नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास करता यावा यासाठी, राजस्थान पोलीसही अटक केलेल्या ओसामा आणि अन्य आरोपींची माहिती बिहार पोलिसांना देणार आहेत.

नाकाबंदीदरम्यान त्यांना पकडले नसते तर त्यांना पकडणे कठीण झाले असते, असे पोलिसांचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com