CID Dainik Gomantak
मनोरंजन

CID ला 26 वर्षेपूर्तीनिमित्त कलाकारांचे रियुनियन

CID: यानिमित्ताने टीमने एकत्र येत सेलिब्रेशन केले आहे.

दैनिक गोमन्तक

CID: टीव्हीवरील असे काही शो आहेत, जे प्रेक्षकांच्या मनात वर्षानुवर्षे घर करतात. त्यापैकीच एक म्हणजे सीआयडी हा आहे. आता या शो ला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने टीमने एकत्र येत सेलिब्रेशन केले आहे.

अलानाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या कॉलचा स्नॅपशॉट पोस्ट केला आणि लिहिले, 'ज्यांनी पॉडकास्टमध्ये मिस केले त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. प्रत्येकजण एकत्र शूटिंगसाठी वाट बघत शकत नाही. अशी एक टीम जिथे तो कुटुंबासारखी वाटते. फ्रेडी सर, तुमची आठवण येते.'

यावर जान्हवीने कंमेट करत मी दुपारच्या झोपेतून उठले आहे, हेच तू पोस्ट शेअर करुन कमावले आहेस असे म्हटले आहे. आता नेटकरी सोशल मिडियावर तुम्हा सगळ्यांना एकत्र पाहायला आवडेल असे म्हणत सीआय़डीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भेटीला येण्याची विनंती केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवाजी साटम यांनी सीआयडी चा दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार असल्याचे म्हटले होते. आता प्रेक्षकांचे हे लाडके कलाकार कधी भेटायला येणार अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ५ डिसेंबर २०२३ ला सीआडीमधील फ्रेडी या पात्राची भूमिका निभावणारे दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. सीआयडी टीममधील कलाकारांसोबतच प्रेक्षकदेखील त्यांची आठवण काढताना दिसत आहेत. त्यांची कमी कोणीही भरु काढू शकत नसल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

SCROLL FOR NEXT