The Kerala Story  Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerala Story : 'द केरला स्टोरी'वर चालणार सेन्सॉर बोर्डाची कात्री... हे सीन कापले जाणार

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासुन देशात चित्रपटांमुळे निर्माण होणारे सामान्य झाले आहेत. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामुळे झालेला वाद तर अगदी टोकाला गेला आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. टीझर लाँच झाल्यापासून या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. 

हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या तयारीत असताना काँग्रेस आणि डावे पक्ष या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. मात्र दरम्यान, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड) ने या चित्रपटावर कात्री लावली आहे.

 CBFC ने अभिनेत्री अदा शर्माच्या या चित्रपटात एक-दोन नव्हे तर 10 कट केले आहेत आणि 'ए' प्रमाणपत्रासह चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. 

निर्माते विपुल शाह यांच्या या चित्रपटातील हटवलेल्या दृश्यांमध्ये केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचाही एक सीन आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन यांची ही मुलाखत होती, असे सांगितले जात आहे.

The Kerala Story

मीडिया रिपोर्ट्सनुसार, द केरल स्टोरीमधून अशी अनेक दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत , जी जातीय सलोख्यानुसार योग्य मानली जात नव्हती. कथितरित्या 'हिंदू देवतांबद्दल चुकीचे संदर्भ आणि अयोग्य संवाद' असलेल्या दृश्यांसाठी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटावर टीका केली आहे. तर अनेक संवाद देखील बदलण्यास सांगितले आहेत.

The Kerala Story

याशिवाय, चित्रपटात कथितपणे एक संवाद आहे, ज्यामध्ये 'भारतीय कम्युनिस्ट हे सर्वात मोठे ढोंगी आहेत' असे म्हटले आहे. त्यातून 'भारतीय' हा शब्द काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाला करण्यात आली आहे. 

चित्रपटात केरळच्या एका माजी मुख्यमंत्र्यांची टीव्ही मुलाखत दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये ते सांगत आहेत की केरळ पुढील दोन दशकांत मुस्लिम बहुल राज्य होईल, कारण राज्यातील तरुणांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रभावित केले जात आहे. सेन्सॉर बोर्डाने ही संपूर्ण टीव्ही मुलाखत चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT