Casting Couch Isha Koppikar Latest News Dainik Gomantak
मनोरंजन

कास्टिंग काऊचवर ईशा कोप्पीकरने व्यक्त केली वेदना; किस्सा शेअर करत म्हणाली..

Casting Couch Isha Koppikar Latest News : 'खल्लास गर्ल' म्हणजेच अभिनेत्री ईशा कोप्पीकरने कास्टिंग काऊचवर खुलासा केला आहे.

दैनिक गोमन्तक

Casting Couch Isha Koppikar Latest News : छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अनेकदा कास्टिंग काउचसारख्या गोष्टी समोर येतात. आता 'खल्लास गर्ल' म्हणजेच अभिनेत्री ईशा कोप्पीकरने यावर खुलासा केला आहे. तिने सांगितले की एका नायकाने तिला एकटीला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावर तिने नकार दिल्यावर तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची घटना घडल्याचा खुलासा ईशाने केला आहे.

ईशा म्हणाली, ही 2000 सालची गोष्ट आहे. एका प्रसिद्ध निर्मात्याने मला त्यांना भेटायला बोलावले होते. त्यादरम्यान त्यांनी मला सांगितले की, तू नायकाच्या नजरेत चांगले असणे आवश्यक आहे. नेमका विषय काय हे जाणून घेण्यासाठी यानंतर मी नायकाला फोन केला, त्याने मला एकटे येऊन भेटायला बोलावले, यासोबतच त्याने मला कोणत्याही स्टाफशिवाय एकटे येण्यास सांगितले. मला हे विचित्र वाटले आणि मी निर्मात्यांना फोन केला. मी त्यांना म्हणाले की, मी इथे माझ्या टॅलेंट आणि लूकमुळे आले आहे, जर मला यावर काम मिळत असेल तर ठीक. माझ्या या बोलण्यावर त्यांनी मला चित्रपटातून काढून टाकले.

ती पुढे म्हणाली, "यामुळे मी पूर्णपणे तुटले होते. मला वाटायचं की इथे तुमचं काम आणि तुमचं दिसणं महत्त्वाचं आहे, पण नाही, तुम्ही अभिनेत्यासोबत चांगले आहात की नाही हे महत्त्वाचे आहे आणि अभिनेत्यासोबत चांगले असण्याचा अर्थ असा आहे की ते सांगतील ते तुम्हाला करावे लागणार. मला वाटते की आपल्या सर्वांची स्वतःची प्राधान्ये आहेत. माझे आयुष्य माझ्यासाठी कामापेक्षा मोठे आहे. स्वतःला आरशात पाहिल्यानंतर मला स्वत:बद्दल बरं वाटावं , त्यामुळे अशा गोष्टींपासून मला लांबच राहायचे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद

SCROLL FOR NEXT