IPL मध्ये आज (23 एप्रिल) गुजरात टायटन्सचा (GT) सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. मागील तीन सामने सलग हरलेल्या कोलकात्यासाठी हा सामना खूप खास असेल, त्यांनी आपला आत्मविश्वास परत मिळवून विजयाच्या मार्गावर परतण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून प्लेऑफच्या शर्यतीत पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.
KKRच्या खेळाडूंमध्ये सातत्याचा अभाव
KKR 7 पैकी 4 सामने गमावून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. हा संघ आयपीएल 2022 मध्ये चांगली सुरुवात राखण्यात अपयशी ठरला आहे. या आयपीएलच्या पहिल्या चार सामन्यांपैकी केकेआरने तीन सामने जिंकले. मात्र, संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे कर्णधार श्रेयस अय्यर जोरदार फॉर्मात आहे.
गेल्या सामन्यात अॅरॉन फिंचही जबरदस्त लयीत दिसला होता. अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांनीही या आयपीएलमध्ये फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. उमेश यादव गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत आहे. मात्र, संघालाही अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. नितीश राणा, व्यंकटेश अय्यर आणि शेल्डन जॅक्सनची फलंदाजीला साथ नाही. कमिन्स आणि रसेलमध्येही सातत्याचा अभाव होता. गोलंदाजीतही उमेश आणि वरुण यांच्याशिवाय अन्य कोणताही गोलंदाज छाप पाडू शकला नाही.
KKR ची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते: वेंकटेश अय्यर, अॅरॉन फिंच, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
तर दुसरीकडे गुजरातचा संघ चॅम्पियनसारखा खेळताना दिसत आहे. हा संघ 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया आणि रशीद खान यांनी फलंदाजीत आपली ताकद दाखवली आहे. या सर्व खेळाडूंनी प्रत्येक सामना स्वबळावर जिंकला आहे. गोलंदाजीतही मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन आणि राशिद खान हे त्रिकूट चांगली कामगिरी करत आहे. गुजरातसाठी चिंतेची बाब म्हणजे विजय शंकर आणि मॅथ्यू वेडसारखे फलंदाज, जे आतापर्यंत विशेष काही करू शकलेले नाहीत.
ही GT ची प्लेइंग इलेव्हन असू शकते: रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, लोकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.