53rd IFFI 2022 Actor Varun Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

53rd IFFI 2022: लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते- Actor Varun Sharma

फुकरे चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता वरुण शर्मा काल गोव्यातील 53 व्या इफ्फीमध्ये "हाऊ टू कार्व्ह युअर निश" या विषयावरील "संभाषणात" सत्रादरम्यान उपस्थितांना संबोधित करत होते.

दैनिक गोमन्तक

फुकरे चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता वरुण शर्मा काल गोव्यातील 53 व्या इफ्फीमध्ये "हाऊ टू कार्व्ह युअर निश" या विषयावरील "संभाषणात" सत्रादरम्यान उपस्थितांना संबोधित करत होते. त्यांच्यासोबत फुक्रे मालिकेचे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा होते. यावेळी बोलताना ते म्हणाले "माझ्यासाठी यश म्हणजे दररोज सकाळी उठून मला जे आवडते आणि जे मला नेहमी करायचे आहे ते करणे आहे"

(53rd IFFI 2022 Actor Varun Sharma)

वरूण शर्मा म्हणाले की त्यांना इतर शैली (जसे की थ्रिलर आणि ग्रे-शेडेड कॅरेक्टर्स) वापरून पहायला आवडेल, पण कॉमेडी ही त्याला करायला आवडते पुढे बोलताना ते म्हणाले लोकांनी विविध चित्रपटांमध्ये त्याच्या पात्रांवर केलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. ते पुढे म्हणाले की कदाचित त्यांची भूमिका म्हणजे कॉमेडी, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि त्यांना हसवणे हीच आहे.

अभिनेता म्हणून त्यांची कारकिर्दीबद्दल बोलताना वरुण शर्मा म्हणाले, “अभिनेते सुरुवातीला आपले स्थान बनवण्याचा विचार करत नाहीत; मग तो प्रवास असो, वेगवेगळ्या भूमिका साकारणे असो किंवा कास्टिंग सारखी इतर कामे करणे असो काम करत असताना शिकायलाही मिळते.

आपल्या प्रवासाची आठवण करून देताना वरुण म्हणाले की, बाजीगर पाहिल्यानंतर अभिनेता बनण्याची इच्छा कशी होती आणि ती इच्छा ‘दिलवाले’पर्यंत कशी राहिली हे मला अजूनही आठवते. दरम्यान त्यांनी सर्कस सारख्या त्याच्या आगामी प्रकल्पांबद्दल देखील खुलासा केला जो ख्रिसमस 2022 च्या आसपास रिलीज होणार आहे.

फुक्रे या चित्रपटाची लोकप्रियता पाहता, अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांशी झालेली चर्चा आणि प्रश्नोत्तरे ही प्रक्रिया, स्वीकृती आणि व्यक्तिरेखा याभोवती केंद्रित झाली. वरुण आणि मृगदीप या दोघांनीही कबूल केले की ही पात्रे दिल्ली परिसरातील सामान्य लोकांपासून प्रेरित आहेत आणि त्यांच्याशी खूप संबंधित आहेत.

'दिलवाले' आणि 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांव्यतिरिक्त, वरुण शर्मा फुकरेमधील मजेदार शेजारच्या मुलाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. यांचा तिसरा चित्रपट 2023 मध्ये येण्याची अपेक्षा आहे कारण ही फ्रेंचायझी आपले दशक पूर्ण करत आहे. दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा यांनी फुक्रे मालिकेसह कॉमेडीमध्ये येण्यापूर्वी डॉन (फरहान अख्तर यांनी लिहिलेले) आणि युवराज (सुभाष घई यांनी लिहिलेले) यांसारख्या चित्रपटांवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), NFDC, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) आणि ESG द्वारे 53 व्या IFFI मध्ये मास्टरक्लास आणि "संभाषणात" सत्रे संयुक्तपणे आयोजित केली जात आहेत. विद्यार्थी आणि चित्रपट रसिकांना चित्रपट निर्मिती प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी मास्टरक्लास आणि इन-कॉन्व्हर्सेशनसह एकूण 23 सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT