Theft In Bicholim: धक्कादायक! एकाच इमारतीतील चार कार्यालये फोडल्याने शहरात खळबळ...

शहारातील एकाच इमारतीतील तीन सरकारी मिळून चार कार्यालये फोडण्याचा प्रकार घडला आहे.
डिचोली-नॅशनल इन्शुरन्स कार्यालयाच्या दरवाजाची तोडण्यात आलेली कडी.
डिचोली-नॅशनल इन्शुरन्स कार्यालयाच्या दरवाजाची तोडण्यात आलेली कडी.Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शहारातील एकाच इमारतीतील तीन सरकारी मिळून चार कार्यालये फोडण्याचा प्रकार घडला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 'टाउन सेंटर' इमारतीत हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.

(Four offices in same building were broken into creating excitement in bicholim )

डिचोली-नॅशनल इन्शुरन्स कार्यालयाच्या दरवाजाची तोडण्यात आलेली कडी.
Goa Crime News: गोव्यात ड्रग्सचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर; ओव्हरडोसमुळे महिलेची प्रकृती बिघडली

इमारतीतील रस्ता वाहतूक, कामगार निरीक्षक, नगर नियोजन खात्याच्या कार्यालयांसह नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय फोडल्याची माहिती मिळाली आहे. ही चोरी नेमकी कशासाठी आणि किती ऐवज चोरीस गेलाय. त्याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी तपास काम हाती घेतले आहे.

वाढती गुन्हेगारी व ड्रग्‍सविक्रीचा सुळसुळाट, यामुळे गोव्याचे नाव बदनाम

राज्यातील वाढती गुन्हेगारी व ड्रग्‍सविक्रीचा सुळसुळाट, यामुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ लागल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेत पोलिस मुख्यालयात पोलिस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ड्रग्स व्यवसायाचा नायनाट करण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत. पर्यटनस्थळाबरोबरच गोवा हे ड्रग्सविक्री केंद्र म्हणून नावारुपास आल्याने सरकारने ड्रग्‍सचा व्यवसायच मोडून काढण्यास ठोस पावले उचलली आहेत.

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सरकारने केली मोठी घोषणा

गोवा सरकारने राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोमंतकीयांना आता घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com