Asrani death news Dainik Gomantak
मनोरंजन

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

Actor Asrani Death News: अष्पपैलू अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

Pramod Yadav

मुंबई: विविध भूमिका करुन रसिकांच्या मनात घर करणारे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी (२० ऑक्टोबर) ३ वाजता त्याचे निधन झाले. अनेक विनोदी भूमिकांसाठी असरानी नेहमीच रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहतील.

सांताक्रूझ येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानींच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती. जूहू येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, बहीण आणि नातू असा परिवार आहे, असरानी यांचे मॅनेजर बाबुभाई थिबा यांनी याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

असरानी यांचा १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे जन्म झाला होता. व्हाईस आर्टिस्ट म्हणून त्यांनी ऑल इंडिया रेडिओमधून करिअरला सुरुवात केली होती. १९६२ मध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले होते. १९६६ मध्ये पुण्याच्या FTII येथून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT