Doctor Strange and KGF  Dainik Gomantak
मनोरंजन

बॉलिवूड, हॉलिवूड की दाक्षिणात्य चित्रपट? कुणी गाजवले बॉक्स ऑफिसवर वर्चस्व

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग स्टारर 'जयेशभाई जोरदार' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला

दैनिक गोमन्तक

बॉक्स ऑफिससाठी शुक्रवारचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी प्रदर्शित झालेले काही चित्रपट विक्रमी कमाई करतात. यावेळी मात्र तसे झाले नाही. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा 'सरकारू वारी पाता' हा चित्रपट गुरुवारी आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार' शुक्रवारी प्रदर्शित झाला. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल करू शकले नाहीत. (Bollywood,Hollywood or South movies who dominated box office this week)

जयेशभाई जोरदार
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग स्टारर 'जयेशभाई जोरदार' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कमाई केली. सुमारे 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे 4.10 कोटींचा गल्ला जमवला.

सरकारु वारी पाता
साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा 'सरकारू वारी पाता' हा चित्रपट गुरुवारी रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 47.40 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाची दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. 'सरकार वारी पता' या चित्रपटाने शुक्रवारी देशभरात केवळ 16.50 कोटींची कमाई केली आहे.

डॉक्टर स्ट्रेंज 2
बेनेडिक्ट कंबरबॅच आणि एलिझाबेथ ओल्सन स्टारर "डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस" ने सुरुवातीच्या काळात जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. इतकंच नाही तर भारतातही हा चित्रपट चांगला कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला. मात्र रिलीजच्या आठव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने जवळपास 3.1 कोटींची कमाई केली आहे. ज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेचे योगदान अनुक्रमे 0.65 आणि 2.45 कोटी इतके आहे.

KGF 2
KGF 2 ने पडद्यावर एक महिना पूर्ण केला आहे आणि आताही चाहते रॉकी भाईला पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अलीकडेच प्रशांत नीलचा 'KGF: Chapter 2' हा SS राजामौलीच्या RRR ला मागे टाकत तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याचवेळी यश स्टारर चित्रपट वीकेंडमध्ये 1200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने शुक्रवारी 2.50 कोटींची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT