Birthday Special: जाणून घ्या सचिन खेडेकरांचा सिनेसृष्टीतला प्रवास

सचिन खेडेकर यांचा जन्म 14 मे 1965 रोजी महाराष्ट्रात झाला.
Sachin Khedekar
Sachin KhedekarDainik Gomantak
Published on

सचिन खेडेकर हे एक भारतीय अभिनेता-दिग्दर्शक आहेत. त्यांनी केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच ठसा उमटवला नाही तर, हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, गुजराती अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. 2005 मध्ये त्यांनी श्याम बेनेगल यांच्या 'नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो' मध्ये महान स्वातंत्र्यसैनिक सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर 'हलाहल' चित्रपटात असहाय्य बापाच्या भूमिकेला न्याय दिला होता. सचिन खेडेकर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 14 मे 1965 रोजी महाराष्ट्रात झाला. सचिनचे पालनपोषण मुंबईतील विलेपार्ले येथे झाले. जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीच्या प्रवासाविषयी.

Sachin Khedekar
Sachin KhedekarDainik Gomantak

थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रवास
सचिन खेडेकर यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याआधी रंगभूमी कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. 1985 पासून त्यांनी नाटकांमध्ये अभिनय कौशल्य दाखवायला सुरुवात केली. 'विधीखेत' हे त्यांचे पहिले नाटक. याशिवाय त्यांनी 2000 साली 'श्याम रंग' हे नाटकही केले.

Sachin Khedekar
Sachin KhedekarDainik Gomantak

1995 मध्ये टीव्हीच्या दुनियेचे दार ठोठावले
त्यानी टीव्हीवरही चांगले नाव कमावले आहे. 1995 मध्ये त्यांनी 'इम्तिहान' या टीव्ही शोमधून टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. 'सैलाब', 'अभिमान' आणि 'संविधान' या टीव्ही शोसाठी ते ओळखले जातात.

Sachin Khedekar
Sachin KhedekarDainik Gomantak

हिंदी चित्रपटांमध्ये छाप सोडली
1997 मध्ये ते 'जिद्दी' चित्रपटात दिसले. या चित्रपटात त्यांनी आकाश प्रधानची भूमिका साकारली होती. यानंतर 1999 मध्ये 'बादशाह'मध्ये ते त्यागराज बच्चनच्या भूमिकेत दिसले. 'अर्जुन पंडित' (1999) मध्ये सिद्धार्थच्या भूमिकेत दिसले. 'दाग - द फायर' (1999) मध्ये इन्स्पेक्टर विनयच्या भूमिकेत दिसले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sachin Khedekar
Sachin KhedekarDainik Gomantak

'या' वेब सिरीजमध्ये काम केले
थिएटर, नाटक, चित्रपट आणि टीव्ही शो याशिवाय सचिनने वेब सिरीजमध्येही हात आजमावला आहे. 2019 मध्ये, ते Zee5 च्या वेबसीरिज 'हुतात्मा' मध्ये दिसले. यामध्ये त्यांनी वामनाची भूमिका साकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com