Urvashi Rutela | Shruti Haasan Dainik Gomantak
मनोरंजन

Urvashi Rutela: श्रृती हासनला 'मान'; उर्वशी रौतेलाला मात्र 'धन'

चिरंजीवीच्या चित्रपटात 3 मिनिटांच्या गाण्यासाठी उर्वशीला जास्त मानधन

Akshay Nirmale

Urvashi Rutela: तेलगू चित्रपटसृष्टीत मेगास्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिरंजीवी याच्या वॉल्टेअर वीरैया या चित्रपटात एका आयटम साँगसाठी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घेतलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात मुख्य नायिका साकारलेल्या श्रृती हासनला देखील उर्वशीपेक्षा कमी मोबदला मिळाला आहे.

विशेष म्हणजे हे गाणे केवळ तीन मिनिटांचे आहे. या चित्रपटातील खलनायकाची भूमिका साकारलेल्या कलाकारापेक्षाही या गाण्यातील परफॉर्मन्ससाठी उर्वशीला जास्त मोबदला मिळाला आहे.

13 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉस पार्टी' हे आयटम साँग आहे. जे उर्वशीवर चित्रित झालेले आहे. या तीन मिनिटांच्या गाण्यावर डान्स करण्यासाठी उर्वशीने तब्बल दोन कोटी रुपये मोबदला घेतला आहे.

विशेष म्हणजे चित्रपटातील खलनायक प्रकाश राज यांनाही उर्वशीपेक्षा कमी मोबदला मिळाला आहे. खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रकाश राज यांना दीड कोटी फी मिळाली आहे. चिरंजीवी आणि उर्वशीची भूमिका असलेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

चिरंजीवीने या चित्रपटासाठी सुमारे 50 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. तर चित्रपटातील दुसरा तेलगू सुपरस्टार रवी तेजा याने 17 कोटी रुपये मोबदला घेतला आहे.

चित्रपटातील मुख्य अभिनेत्री श्रुती हासनने 2.5 कोटी रूपये फीस घेतली आहे. तर उर्वशीला मात्र 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 2 कोटी रुपये मिळाले आहेत.

कमावले वॉलटेर वीरैया हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात चिरंजीवीने डॉनची भूमिका साकारली आहे तर रवी तेजाने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 10 दिवसांत जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

उर्वशी रौतेला अनेकदा क्रिकेटर ऋषभ पंतमुळे चर्चेत असते. पंत आणि उर्वशीची सोशल मीडियावरील बाचाबाची चर्चेची ठरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT