Salman Khan :"किसी का भाई किसी की जान"मध्ये सलमानसोबत शहनाज? चाहते झाले थक्क

'किसी का भाई किसी की जान'मध्ये सलमान खानसोबत आता शेहनाज गिल दिसणार आहे
Salman Khan
Shehnaaz Gill
Salman Khan Shehnaaz Gill Dainik Gomantak
Published on
Updated on

Salman Khan's 'Kisi ka bhai kisi ki jaan': बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता आपला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पठाण चित्रपटाच्या सुरूवातीला थिएटर्समध्ये सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा टिझरही बघायला मिळाला आहे

शाहरुख खानचा 'पठाण' पाहण्यासाठी आलेल्या सलमान खानच्या सर्व चाहत्यांना थिएटरमध्ये डबल ट्रीट मिळाली. शाहरुखच्या चित्रपटात सलमान खानच्या कॅमिओशिवाय, सलमान खानने त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टीझरही रिलीज केला, जो 'पठाण'शी संबंधित होता. त्यानंतर सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर टीझर शेअर केला. 

चाहत्यांना आपल्या एका रोमांचक चित्रपटाची ओळख करून देताना सलमानने लिहिले, 'सही का होगा सही, गलत का होगा गलत, KisiKaBhaiKisiJanTeaser out....' एका मिनिटापेक्षा जास्त असणाऱ्या या टिजरमध्ये, शहनाज गिल सलमानसोबत फ्रेम शेअर करताना दिसत आहे साहजिकच त्यांचे चाहते त्यांच्या या नव्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे आश्चर्यचकित झाले होते.

Salman Khan
Shehnaaz Gill
Gadar 2 First Look : 'गदर 2'चा फर्स्ट लूूक रिलीज..'बॉबी देओल' ने ट्विट्टरवरुन पोस्टर केलं शेअर

'किसी का भाई किसी की जान'मध्ये भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' यावर्षी एप्रिलमध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. 

या चित्रपटाशिवाय सलमान खान 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे. मनीश शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान मोठ्या पडद्यावर इमरान हाश्मीसोबत फाईट करताना दिसणार आहे. हा अॅक्शन एंटरटेनर यावर्षी नोव्हेंबरमध्ये पडद्यावर येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com