Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Rakul Preet-Jackky Bhagnani wedding Photo: रकुल-जॅकीने गोव्यात घेतले सात फेरे; लग्नाचे Exclusive Photo समोर

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता व चित्रपट निर्माता जॅकी भगनानी दोघेही लग्न बंधनात अडकले आहेत.

Manish Jadhav

Rakul Preet-Jackky Bhagnani wedding Photo: बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता व चित्रपट निर्माता जॅकी भगनानी आज लग्न बंधनात अडकले. गोव्यातील अलिशान हॉटेलमध्ये जोडप्याने पंजाबी आणि सिंधी या दोन्ही पद्धतीने विवाह केला. दरम्यान, रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन लग्न सोहळ्याची झलक दिली आहे, चाहते कमेंट सेक्शनमध्ये दोघांचे अभिनंदन करत आहे.

लग्नाचे फोटो शेअर करताना रकुलने इंस्टाग्रामवर लिहिले की, “आता कायमचा माझा... आता दोन्ही भगनानी.” शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये जॅकी गडद चष्मा घातलेला दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे, गोव्यात लग्नासाठी रवाना होण्याच्या एक दिवस आधी या जोडप्याने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर नवविवाहित जोडपे सर्व पाहुण्यांसाठी पार्टीचे आयोजन करणार आहे. हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय जोडप्यासोबत सामील होतील. शिल्पा आणि राज व्यतिरिक्त रकुलचा जवळचा मित्र आणि अभिनेता वरुण धवनने रकुल आणि जॅकीसाठी खास परफॉर्मन्स दिला. संगीत सेरेमनीमध्ये वरुणने 'कुली नंबर 1'मधील 'हुस्न है सुहाना' गाण्यावर डान्स केला.

आयुष्मान खुराना, ताहिरा कश्यप, भूमी पेडणेकर, रितेश देशमुख, शाहिद कपूर, मीरा राजपूत कपूर, वरुण धवन, नताशा दलाल, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे यांसारख्या स्टार्सनी लग्नाला हजेरी लावली होती. पंजाबी आणि सिंधी रितीरिवाजांनी हे लग्न पार पडले. 21 फेब्रुवारी रोजी पहाटे पंजाबी रितीरिवाजानुसार आनंद कारज सोहळा पार पडला. त्यानंतर दुपारी दोन्ही स्टार्सने सिंधी रितीरिवाजानुसार लग्न केले.

दुसरीकडे, 19 फेब्रुवारीपासून रकुल आणि जॅकीच्या प्री-वेडिंग विधींना सुरुवात झाली होती. या जोडप्याने ऑक्टोबर 2021 मध्ये अधिकृतपणे घोषणा केली होती की, ते रिलेशनशिपमध्ये आहेत. अपकमिंग प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, रकुल कमल हसनसोबत 'इंडियन 2' मध्ये दिसणार आहे. यामध्ये बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात कमल हसनही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT