Satish Kaushik Daughter Vanshika Dainik Gomantak
मनोरंजन

Satish Kaushik Daughter: सतिश कौशिक यांच्या मुलीसाठी दिग्गज अॅक्टर मैदानात

Satish Kaushik Daughter: सतीश कौशिक तिला गोष्टी सांगत असायचे ते तीला आठवत असल्याचे वंशिकाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Satish Kaushik Daughter: बॉलीवूडमध्ये असे काही दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असतातच मात्र आपल्या व्यक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. यापैकी एक म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे आहेत.

अनुपम खेर नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पून्हा एकदा त्यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्राच्या मुलीला फिल्ममध्ये लॉंच करण्याचे वचन दिले आहे. ही मुलगी म्हणजे सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका आहे.

वंशिका अनुपम खेर यांना त्यांच्या ऑफीसमध्ये भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी अनुपम खेर यांनी तिच्यासोबत विविध विषयांवर गप्पा मारल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीलाच अनुपम खेर तिला विचारतात, तुला प्रिसेंस असल्यासारखे वाटत का ? त्यावर वंशिका हो असं उत्तर दिल्याच पाहायला मिळत आहे. यावर अनुपम खेर यांनी आपल्याला लहानपणी मला असेच वाटायचे असे म्हटले आहे. तू दिवसभर काय करतेस असं विचारल्यावर वंशिकाने आपली दिनचर्या सांगितली आहे. याशिवाय तिला क्राफ्ट करत असल्याचे ती म्हणत आहे.

अशा प्रकारे वंशिका आणि अनुपम खेर यांनी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. आर्ट अॅंड क्राफ्ट बरोबरच वंशिकाने म्युझिकमध्ये आवड असल्याचे सांगितले आहे. रात्री झोपताना तिचे वडील सतीश कौशिक तिला गोष्टी सांगत असायचे ते तीला आठवत असल्याचे वंशिकाने म्हटले आहे.

अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहले आहे की, काल वंशिका मला माझ्या ऑफीसमध्ये भेटायला आली होती. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली, तिचे वडील आणि माझे जवळचे मित्र सतीश यांच्याविषयी देखील बोललो.

वंशिका खूप हुशार मुलगी असून माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मी खूप गोष्टी तिच्याकडून शिकतो. याबरोबरच, अनुपम खेर यांनी वंशिकाला सध्या अभ्यास करण्याचे सांगतिले असून जेव्हा ती मोठी होईल आणि तीला जर अॅक्टींगमध्ये करिअर करायचे असेल तर ते तिला मदत करतील असे देखील अनुपम खेर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांचे अचानक दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी आहे. अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर वंशिकासोबत वेळ घालवला आहे आणि तिला सपोर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे नेहमीच दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT