Ajay Devgn's Upcoming Movie Bholaa Teaser Out 
मनोरंजन

Bholaa Teaser Out: कपाळी भस्म, हातात भगवद्गगीता; अजय देवगनचा नव्या चित्रपटातील लूक

'भोला'चा जबरदस्त टीझर रीलीज; साऊथच्या सुपरहिट चित्रपटाचा आहे रीमेक

Akshay Nirmale

Ajay Devgn's Upcoming Movie Bholaa Teaser Out: सध्या बॉलीवुड अभिनेता अजय देवगनच्या 'दृश्यम 2' ची सर्वत्र चर्चा आहे. एरवी एखाद्या चित्रपटाचे सीक्वेल इतके चांगले होत नाहीत, पण 'दृश्यम 2' ची परिस्थिती वेगळी आहे. तो पहिल्या पार्ट इतकाच प्रभावी आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे सर्वत्र सध्या कौतूक होत आहे. हीच प्रसिद्धी एनकॅश करण्यासाठी अजयच्या आगामी चित्रपटाचा टीझरही आता रीलीज करण्यात आला आहे.

अजयच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'भोला.' या चित्रपटाच्या जबरदस्त टीझरने बुधवारी अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपुर्वीच अजयने या चित्रपटाचे पोस्टर रीलीज केले होते. तेव्हापासून चाहत्यांना या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता होती.

टीझरची सुरवात लखनौतील एका अनाथाश्रमातून होते. त्यात ज्योती नावाची एक लहान मुलगी राहते. तिला एक महिला लवकर झोपी जाण्यास सांगते, कारण तिला भेटायला उद्या कुणीतरी येणार आहे. त्यानंतर भोलाची एंट्री होते. त्याच्या कपाळावर भस्म आणि हातात भगवद्गगीता हा ग्रंथ आहे. तो तुरूंगातून सुटणार आहे.

एकंदरीत अजयचा अॅक्शन अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'भोला' चे दिग्दर्शन स्वतः अजय देवगन करत आहे. यापुर्वी अजयने त्याच्या 'रनवे 34' तसेच 'यु मी और हम' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

'भोला' हा चित्रपट 2019 मध्ये आलेल्या तमिळ 'कैथी' या चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. त्यात अभिनेता कार्तीने मुख्य भूमिका साकारली होती. 'कैथी'चे दिग्दर्शन लोकेश कनगराज याने केले होते. दरम्यान, हा मूळ 'कैथी' चित्रपट यु ट्युबर हिंदीमध्ये उपलब्ध आहे.

दरम्यान, आगामी काळात अजय देवगनचा रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल 5' यासह 'मैदान' हा फुटबॉलवर आधारीत चित्रपटही रीलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT