Bobby Deol Dainik Gomantak
मनोरंजन

Bobby Deol: बॉबी देओलने सांगितला वाघाबरोबरच्या शूटींगचा अनुभव

दैनिक गोमन्तक

Bobby Deol: सध्या बॉबी देओल त्याच्या अॅनिमल या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तेव्हा काही सेंकदाच्या बॉबी देओलच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.

आता एका मुलाखतीदरम्यान, बॉबी देओलने आपल्या पहिल्या चित्रपटातले अनुभव शेअर केले आहेत. बॉबी देओलने 1995 मध्ये ट्विंकल खन्नासोबत 'बरसात' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यामुळे बॉबी देओल रातोरात स्टार झाला होता. या चित्रपटात बॉबी देओल कधी घोड्यावर स्वार होताना तर कधी वाघाशी लढताना दिसत होता. आता त्याने खऱ्या वाघासोबत कसे शूटिंग केले याबद्दलचे किस्से सांगितले आहेत.

वाघाला हाताळणाऱ्या लोकांनी आधी त्याच्या मानेवर मांसाचा तुकडा ठेवला, जेणेकरून वाघ त्याच्यावर झेपावेल. मात्र यावेळी वाघाचे दात अभिनेत्याच्या मानेपासून काही इंच दूर होते. बॉबी देओलने तो सीन इटलीमध्ये शूट केल्याचे सांगितले होते.

दरम्यान, आता बॉबी देओलने बॉलीवूड( Bollywood )मध्ये दुसऱ्यांदा जबरदस्त कमबॅक केले आहे. त्याच्या अॅनिमल चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे. बॉबी देओलची या चित्रपटात नेमकी काय भूमिका आहे हे पाहणे प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर( Ranbir Kapoor ), रश्मीका मंधाना, अनिल कपूर यासारखे लोकप्रिय कलाकार दिसत आहेत.अॅनिमल १ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT