Bobby Deol Dainik Gomantak
मनोरंजन

Bobby Deol: 'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल थेट तमिळ चित्रपटात दिसणार

Bobby Deol: या चित्रपटात सूर्या आणि बॉबी देओल व्यतिरिक्त दिशा पटानी देखील दिसणार आहे. हा चित्रपट 38 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bobby Deol: सध्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ माजवला आहे. चित्रपटावर अनेक आरोप होत असले आणि चित्रपटाला काही प्रमाणात ट्रोल केलं जात असलं तरीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

चित्रपटातील बॉबी देओलची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या चित्रपटानंतर चाहत्यांच्या बॉबी देओलकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आता बॉबी देओल तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे.

सूर्याच्या 'कंगुवा' या चित्रपटातून तो तमिळ चित्रपटांमध्ये प्रवेश करत आहे. खुद्द बॉबी देओलने याला दुजोरा दिला आहे. 'अॅनिमल' नंतर तो आता 'कांगुवा'मधील भूमिकेच्या तयारीत व्यस्त आहे. 'कंगुवा'चे दिग्दर्शन शिवाने केले आहे. या चित्रपटात सूर्या आणि बॉबी देओल व्यतिरिक्त दिशा पटानी देखील दिसणार आहे. हा चित्रपट 38 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉबी देओल म्हणाला, 'होय, मी सूर्यासोबत कांगुवा करत आहे. ही एक अप्रतिम टीम आहे. शिव आणि सूर्या अप्रतिम अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे खरोखरच आनंददायी असल्याचे बॉबी देओलने म्हटले आहे. पुढे तो म्हणतो, 'ही भूमिका माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. मला भाषाही येत नाही. मी कदाचित एक-दोन महिन्यांत तमिळही शिकणार नाही, पण मी त्यावर काम करेन.'

संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल'मध्ये बॉबी देओल अबरार नावाच्या नकारात्मक भूमिकेत दिसला होता. यात त्यांचा एकही संवाद नव्हता कारण पात्र मूक होते. पण बॉबी देओलने 15 मिनिटांच्या भूमिकेत दबदबा निर्माण केला आणि तोच त्याच्याबद्दल बोलला जात आहे.

'अ‍ॅनिमल'च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याने 11 दिवसांत 445.12 कोटींची कमाई केली आहे. याने जगभरात 737.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. बॉबी देओलशिवाय या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT