Bipasha Basu Dainik Gomantak
मनोरंजन

Bipasha Basu Baby: बिपाशा बसू अन् करण सिंग ग्रोव्हरच्या मुलीचे ठरले नाव

Bipasha Basu Baby: बिपाशा बसूने आपल्या मुलीचे 'हे' नाव ठेवले आहे.

दैनिक गोमन्तक

Bipasha Basu Baby: सध्या बॅालिवुडमध्ये अनेक अभिनेत्री आई बनण्याचा आनंद घेत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरही आई-वडील झाले आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री बिपाशा बसूने शनिवारी एका मुलीला जन्म दिला. बिपाशा वयाच्या 46 व्या वर्षी आई झाली. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॅालिवुडमधले पॉवर कपल आहे.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी आतापर्यंत सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. पण ही माहिती या जोडप्याच्या टीमच्या वतीने चाहत्यांना देण्यात आली. त्यांच्याकडून बिपाशा आणि करणच्या घरी छोटी परी आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर बिपाशा आणि करणवर बॅालीवुड (Bollywood) मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच, सोशल मीडियावर चाहते या दोघांचे अभिनंदन करत आहेत. मात्र, आता बिपाशाच्या छोट्या परीचे नाव पण ठरल्याची माहिती समोर आली आहे. 'देवी बसु सिंह ग्रोवर' असे नाव बिपाशाने आपल्या मुलीचे ठेवले असल्याचे बोलले जाते.

दरम्यान, बिपाशा बसूने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसी (pregnancy) ची घोषणा केली होती. यादरम्यान बिपाशाने तिचा पती करण सिंग ग्रोव्हरसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या पोस्टसह बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा... एका नवीन प्रकाशाने आमच्या आयुष्यात एक नवीन छटा जोडली आहे. हे आम्हाला नेहमीपेक्षा अधिक परिपूर्ण बनवत आहे. आम्ही आमचं आयुष्य वेगळं सुरू केलं, मग आम्ही भेटलो आणि तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. फक्त दोन लोकांसाठी हे प्रेम खूप आहे, जे थोडेसे अयोग्य वाटते. त्यामुळे आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत.'

Bipasha Basu and karan

दरम्यान, बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांनी एप्रिल 2016 मध्ये लग्न केले होते. दोघे पहिल्यांदा त्यांच्या 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. दोघांनी 2015 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि एका वर्षानंतर त्यांनी लग्न केले. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडते आणि आता लग्नाच्या सहा वर्षानंतर ते आई-वडील झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT