Bigg Boss 17 Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Promo: विकी अन् नीलच्या भांडणात मुनव्वरने मारली कॅप्टन्सीची बाजी

Bigg Boss 17 Promo: त्यासाठी घरात एक टास्क पाहायला मिळाला असून विक्की-नील, ऐश्वर्या-अंकिता, ईशा आणि मन्नारा यांच्यामध्ये भांडणे होताना पाहायला मिळाली आहेत.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या घरात रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता बिग बॉसच्या घराला पहिला कॅप्टन मिळाला आहे.

त्यासाठी घरात एक टास्क पाहायला मिळाला असून विक्की-नील, ऐश्वर्या-अंकिता, ईशा आणि मन्नारा यांच्यामध्ये भांडणे होताना पाहायला मिळाली आहेत.

बिग बॉसच्या शो चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला रिंकू धवन यांनी स्पर्धकांना बिग बॉसची चिठ्ठी वाचत टास्कविषयी माहीती दिली आहे.

त्यानंतर जेव्हा टास्कला सुरुवात होते आणि पहिला बझर वाजतो तेव्हा अभिषेक कुमार, विकी जैन आणि नील भट्ट सगळ्यात आधी पोहचल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर ऐश्वर्या ही चांगली कॅप्टन असू शकत नाही असे म्हणत तिला स्पर्धतून बाहेर करतो, तर लगेच नील विकीचे नाव घेत त्याला स्पर्धतून बाहेर करतो.

यांच्या भांडणावर अभिषेक कुमार हसत असून ऐश्वर्याला विकीला न आता न जाता विकी माता असे म्हणत टोमणा मारते.

त्यानंतर मन्नारा ईशाचे नाव घेते, त्यावर ईशा ती मुनव्वरचेदेखील नाव घेऊ शकली असती असे म्हणते. माझ्या डोक्यात तुझे नाव घेण्याची कल्पना नव्हती मात्र आता मी जाईन तर तुझेच नाव घेईन असे ईशाने म्हटले आहे.

ऐश्वर्या शर्मा जेव्हा अंकिताचे नाव घेते तेव्हा अंकिता भडकलेली पाहायला मिळत आहे. मात्र या सगळया भांडणात कॅप्टन्सी मुनव्वरने जिंकली आहे.

दरम्यान, मुनव्वरने कॅपटन्सी जिंकून घराची जबाबदारी घेतली असली तरीही आता तो कशाप्रकारे आपली जबाबदारी सांभाळतो हे पाहणे महत्वाचे ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

SCROLL FOR NEXT