Bigg Boss 17 Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: बिग बॉसच्या 17 व्या सीझनला राड्याने सुरुवात

Bigg Boss 17: ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून मोठ्या उत्सुकतेने ज्या शोची वाट बघत होते त्या शोची सुरुवात मोठ्या धुमधडाक्यात झाली आहे. बिग बॉसच्या १७ व्या सीझनला सुरुवात झाली असून घरात प्रवेश करताच सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे.

सेटनंतर घरातील सदस्यांसमोर ईशा मालवीय आणि अभिषेक कुमारचे कडाक्याचे भांडण झाले. ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. शोच्या सुरुवातीलाच त्यांना असे बघून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे, बिग बॉसने अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला स्वत:च्या बुद्धीचा वापर केल्याबद्दल फटकारले आहे.

बिग बॉसमध्ये तीन प्रकारची घरे असल्याचे दिसत आहे. दिल, दिमाग, दम अशी तीन नावे या घरांना देण्यात आली आहेत.

कोणता सदस्य कोणत्या घरात आहे ?

ईशा मालवीय, मनारा चोप्रा, अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट 'दिल' या घरात आहेत. 'दिमाग' मध्ये अरुण श्रीकांत मशेट्टी, जिग्ना व्होरा, सोनिया बन्सल, सना रईस खान, नवीद सोले आणि अनुराग डोवाल: द UK07 रायडर हे आहेत. 'दम' या घरात मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, सनी 'तहलका', रिंकू धवन आणि फिरोझा खान उर्फ ​​खानजादी हे आहेत. या सीझनमध्ये एकूण 17 स्पर्धकांनी प्रवेश केला आहे.

विकी जैनही चर्चेत

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैनही चर्चेत आहे. घरात प्रवेश केल्यावर लगेच विकिने आपला गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. काही स्पर्धकांना तो घर बदलण्यासाठी सल्ले देताना दिसून आला होता.

यावर बिग बॉसने त्याला चांगलेच फटकारले आहे. तुला तुझ्या बुद्धीचा एवढाच वापर करायचा आहे तर तर दिल मध्ये दिमागच्या घरात राहायचे होते. बिग बॉस( Bigg Boss )ने फटकारल्यानंतर विकी गप्प बसलेला दिसला. तर यावरुन अंकिता त्याच्यावर रागवताना दिसली.

आता बिग बॉसची सुरुवातच इतकी धुमधडाक्यात झाली आहे की, बिग बॉसचे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता कोणावर वरचढ ठरणार आणि कोण कोणाचे मन जिंकून घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, थकबाकीची रक्कमही मिळणार

Trigrahi Yog 2026: 22 ऑगस्टला बनतोय सर्वात शक्तिशाली 'त्रिग्रही योग'! 4 राशींच्या पदरात पडणार श्रीमंती अन् यश; भाग्योदयाचे दिवस सुरु होणार

SCROLL FOR NEXT