Alia-Ranbir Wedding News  Dainik Gomantak
मनोरंजन

आलिया-रणबीरच्या लग्नाबद्दल समोर आली मोठी माहिती, महेश भट्ट म्हणाले...

दोघांचे लग्न ठरले असून आलियाचा डिझायनर सब्यसाचीसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने चाहते वेडे झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Alia-Ranbir Wedding News : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माहितीनुसार, दोघे एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचे लग्न ठरले असून आलियाचा डिझायनर सब्यसाचीसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने चाहते वेडे झाले आहेत.

अलीकडेच रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) काकू रीमा जैन यांनी लग्नाच्या बातम्या फेटाळून लावल्या आणि सांगितले की, 'मला अद्याप याबद्दल माहिती नाही. ते लग्न करतील, पण मला माहित नाही कधी. लग्न करण्याचा निर्णय त्यांचा आहे आणि जेव्हा ते करतील तेव्हा तुम्हा सर्वांना याची कल्पना येईलच'. (Big information came out about Alia-Ranbir's marriage, Mahesh Bhatt said ...)

महेश भट्ट यांनी दिली प्रतिक्रिया

लग्नाच्या प्रश्नावर महेश भट्ट (Mahesh Bhatt) म्हणाले, या सर्व अफवा आहेत ज्या अनेक दिवस आणि वर्षानुवर्षे सुरू आहेत. महेश भट्ट यांनी यापेक्षा अधिक काही सांगितले नाही, पण रीमा जैन म्हणाल्या की, आम्ही कोणतीही तयारी केली नाही, मग इतक्या लवकर लग्न कसे होणार? हे खरे असेल तर माझ्यासाठीही धक्कादायक असेल. लग्न होईल, पण कधी माहित नाही.

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर हे दोघेही नुकतेच वाराणसीहून परतले आहेत. दोघांनी अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण करून हे लोक वाराणसीहून परत येताच चित्रपट निर्माते अयानने सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, चित्रपटाचे अधिकृत शूटिंग पूर्ण झाले आहे. यासोबतच अयान मुखर्जीने काही फोटोही शेअर केले आहेत.

नुकताच आलिया भट्टचा 'RRR' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 5 दिवसांत 107.59 कोटींची कमाई केली आहे. 5 दिवसांत राजामौलीच्या RRR चित्रपटाचे हिंदी व्हर्जनचे एकूण कलेक्शन 107.59 कोटींवर गेले आहे. दिल्ली, गुजरात, यूपी, बिहार, राजस्थान या हिंदी मास सर्किटवर RRR चित्रपटाचे वर्चस्व आहे. आरआरआरने 19 कोटींचे खाते उघडले होते. तेव्हापासून चित्रपटाच्या कमाईचा आलेख वाढतच चालला आहे. याशिवाय आलिया भट्ट 'RRR' चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. चित्रपटाच्या फायनल कटमध्ये छोट्या भूमिकेमुळे आलिया दिग्दर्शकावर नाराज झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT