Dasvi : अभिषेक बच्चनने दिलेले वचन केले पूर्ण, आग्रा जेलमध्ये पोहोचून दिली कैद्यांना खास भेट

'कैद्यांच्या प्रतिक्रिया या माझ्यासाठी आठवणी आहेत'
Bollywood Actor Abhishek Bachchan
Bollywood Actor Abhishek Bachchan dainik gomantak

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी 'दासवी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिषेक एका भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारत असून तो तुरुंगात जातो असे चित्रीत करण्यात आले आहे. याचे चित्रीकरण आग्रा जेलमध्ये वर्षभरापूर्वी झाले होते. विशेष म्हणजे या चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये तुरुंगातील खऱ्या कैद्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्या प्रसंगी अभिषेक बच्चनने कैद्यांना एक वचन दिले होते. जे त्याने आता पूर्ण केले आहे. ज्यामुळे अभिषेक बच्चन सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. 'दुसवी' चित्रपटाचे तुषार जलोटा यांनी दिग्दर्शन केले असून हा चित्रपट ७ एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म, Netflix आणि Jio सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत यामी गौतमी आणि निम्रत कौर मुख्य भूमिकेत आहेत. (Bollywood Actor Abhishek Bachchan organized the first projection of his Dasvi movie in Agra Central Prison)

अभिनेता अभिषेक बच्चन (Actor Abhishek Bachchan) याने आग्रा जेलमध्ये वर्षभरापूर्वी चित्रपटाचे चित्रीकरण केले होते.तेव्हा त्याने येथील कैद्यांना चित्रपट पाहण्याची संधी देण्याचे वचन दिले होते. ते वचन आता अभिषेकने पूर्ण केले असून मंगळवारी आग्रा तुरुंगात (Central jail) या चित्रपटाचे पहिले स्क्रिनिंग पार पडले. यानिमित्ताने तुरुंगातच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अभिषेक बच्चनसह इतर कलाकारांनीही तुरुंगातील कैद्यांमध्ये (Prison) आपला संपूर्ण दिवस घालवला.

Bollywood Actor Abhishek Bachchan
रिलीज होण्याआधीच 'KGF Chapter 2' ने केला विक्रम

या खास प्रसंगाचा एक व्हिडिओ अभिषेकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीपासून ते संध्याकाळपर्यंतच्या कार्यक्रमाची छोटीशी झलक पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये अभिषेकची एक वर्ष जुनी क्लिप जोडण्यात आली आहे, ज्यामध्ये तो 'जसा हा चित्रपट तयार होईल' असे म्हणताना दिसत आहे. मला तो पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल, म्हणून आम्ही इथे येऊन हा चित्रपट तुमच्या सर्वांसमोर पाहत आहोत, असेही त्याने म्हटले आहे.

यानंतर, व्हिडिओमध्ये अभिषेक मंचावरून म्हणतो, 'एका वर्षापूर्वी जेव्हा आम्ही येथून जात होतो, तेव्हा मी वचन दिले होते की, चित्रपट (Film) तयार होताच. तो तुम्हाला प्रथम दाखवले जाईल. त्याप्रमाणे आम्ही येथे आलो आहोत. तर व्हिडिओच्या शेवटी प्रत्येकजण मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'वादा तो वचन होता है. काल रात्री मी एक वर्षापूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यात यशस्वी झालो. आग्रा सेंट्रल जेलच्या (Agra Central jail) सुरक्षेत गुंतलेल्या कर्मचारी आणि कैद्यांसाठी आमच्या दासवी चित्रपटाचे पहिले स्क्रिनिंगचे आयोजित करण्यात आले होते. आम्ही येथे चित्रपटाचे चित्रीकरण केले. त्यांच्या प्रतिक्रिया या माझ्यासाठी आठवणी आहेत, ज्या मी आयुष्यभर जपत राहीन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com