Barbie Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Barbie Box Office Collection : 'बार्बी'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई ;पण भारतात मात्र 'ओपेनहायमर'चीच जादू

बार्बी चित्रपटाने जगभरातल्या चाहत्यांना वेड लावत बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे.

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र बार्बीची चर्चा सुरू आहे. भारतात तसेच जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर बार्बीने जोरदार कमाई केली आहे. बार्बी डॉलनंतर आता बार्बी चित्रपटाने चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटाने बॉलीवूडच्या कलाकारांवर आपला प्रभाव पाडला आहे . चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ दमदार कामगिरीच केली नाही तर त्यासोबत या चित्रपटाने 5 नवे रेकॉर्ड रचले आहेत

काल्पनिक गुलाबी जगाने केली जोरदार कमाई

दिग्दर्शक ग्रेटा गेरविगच्या 'बार्बी' चित्रपटाने इतिहास रचला आहे. या काल्पनिक गुलाबी जगाच्या चित्रपटाने गेल्या 17 दिवसांत केवळ गुलाबी रंगाने प्रेक्षकांची हृदये आणि मने भरून काढली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवर $1 बिलियन पेक्षा जास्त म्हणजेच 8,300 कोटी रुपयांचे जगभरात एकूण कलेक्शन देखील केले आहे. 

ओपेनहायमरशी जोरदार टक्कर

मार्गोट रॉबी आणि रायन गोसलिंग स्टारर, हा चित्रपट 2023 मधील दुसरा मोठा चित्रपट बनला आहे, ज्याने $1 बिलियनचा टप्पा ओलांडला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट क्रिस्टोफर नोलनच्या 'ओपेनहाइमर' सोबत 21 जुलै रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून 'बार्बी विरुद्ध ओपेनहायमर'चा असा संघर्ष सुरू होता. ही शर्यत नक्कीच 'बार्बी'ने जिंकली आहे.

भारतात ओपेनहायमर वरचढ

गंमत म्हणजे जगभरात बार्बीने ओपेनहायमरला मागे टाकले असले तरी भारतात मात्र ओपेनहायमर सरस ठरला आहे.  भारतात 'बार्बी'पेक्षा 'ओपेनहायमर'चे कलेक्शन चांगले आहे. 'बार्बी'ने 17 दिवसांत भारतात 42.22 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर 'ओपेनहायमर'ने 113.75 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. 'बार्बी'ने तिसर्‍या वीकेंडमध्ये रविवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर 1.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर 'ओपेनहायमर'ने 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बार्बीचे बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्ड

'बार्बी'ने आतापर्यंतच्या 17 दिवसांच्या प्रवासात अनेक नवे विक्रमही रचले आहेत. हा एकीकडे ग्रेटा गेर्विगच्या दिग्दर्शनाखाली बनलेला सर्वात मोठा चित्रपट ठरला असतानाच, तो आजपर्यंतच्या कोणत्याही महिला दिग्दर्शकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

2023 मध्ये 17 दिवसांत सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही 'बार्बी'च्या नावावर आहे. याशिवाय हा सर्वात मोठा ओपनिंग नॉन सीक्वल चित्रपट आहे. एका खेळण्यावर आधारित हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील आहे.

'द सुपर मारियो ब्रदर्सनंतरची सर्वाधिक कमाई

मार्गोट रॉबी आणि रायन गोस्लिंग या मुख्य कलाकारांच्या कारकिर्दीतील 'बार्बी' हा सर्वात मोठा चित्रपट आहे. 'द सुपर मारियो ब्रदर्स' नंतर 2023 मध्ये हॉलिवूडचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट. मार्गोट रॉबी आणि रायन गोस्लिंग यांच्याशिवाय या चित्रपटात सिमू लिऊ, विल फेरेल, एम्मा मॅकी, अमेरिका फेरेरा, न्कुटी गटवा यांच्याही भूमिका आहेत. रॉबीने टॉम अॅकर्ले, रॉबी ब्रेनर, डेव्हिड हेमन, लॉरेन्स मार्क आणि एमी पास्कल यांच्यासह चित्रपटाची निर्मिती केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: भंडारी समाजाची नवनिर्वाचित समिती बेकायदेशीर!

Canacona: काणकोणात विजेचा लपंडाव! भूमिगत वीजवाहिन्या घालूनही रड संपेना; उच्च दाबामुळे वीज उपकरणे निकामी

CM Pramod Sawant: गोव्यात '100 टक्के' विमा संरक्षण देण्याचे लक्ष्य! मुख्यमंत्र्यांनी केले महत्व अधोरेखित

Goa Illegal Fishing: मत्स्योद्योग व्‍यवसाय संकटात! परप्रांतीय टॉलर्सचा राज्यात हैदोस; बुल ट्रॉलिंग, एलईडीद्वारे मासेमारी

IFFI Goa 2024: यंदाही कला अकादमीत इफ्फीच्या चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार नाही; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT