Bachchan Pandey Dainik Gomantak
मनोरंजन

'बच्चन पांडे' बॉक्स ऑफिसवर फेल?

अक्षय कुमार, क्रिती सॅनन आणि जॅकलिन फर्नांडिससारखे स्टार्स असूनही 'बच्चन पांडे' ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

दैनिक गोमन्तक

होळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला 'बच्चन पांडे' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अयशस्वी ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13.25 कोटींची कमाई केली.

चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली?
अक्षय कुमार (Akshay Kumar), क्रिती सॅनन आणि जॅकलिन फर्नांडिससारखे स्टार्स असूनही 'बच्चन पांडे' ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. बॉक्स ऑफिसवर (Box Office) थंड सुरुवात केल्यानंतर 'बच्चन पांडे'ने दुसऱ्या दिवशी केवळ 12 कोटींची कमाई केली. अक्षयच्या चित्रपटाने 2 दिवसात केवळ 25.25 कोटींची कमाई केली आहे.

'बच्चन पांडे' पाहिल्यानंतर अनेक लोकांनी याबाबत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. काहींना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काहींसाठी तो कंटाळवाणा ठरला आहे. अनेक लोकांनी ट्वीट करत आपले मत मांडले. काही लोकांना चित्रपटात (Movie) कॉमेडी आणि अ‍ॅक्शनचा उत्तम मिलाफ आहे असे वाटले, तर काहींना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. 'बच्चन पांडे' हा चित्रपट दिग्दर्शक फरहाद सामजीने बनवला आहे. अनुपम खेरचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट 'बच्चन पांडे' ला चांगली टक्कर देत आहे, असे अनेक लोकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT