Ayushmann Khurrana in Doctor G movie Twitter/@_AKlover_
मनोरंजन

आयुष्मान खुरानाने ‘डॉक्टर जी’ सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला

चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून पुन्हा एकदा आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) काही वेगळं करणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि शेफाली शाह यांच्या पुढच्या चित्रपटाच्या ‘डॉक्टर जी’ (Doctor G) चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून पुन्हा एकदा आयुष्मान खुराना काही वेगळं करणार आहे. आयुष्मान खुराना 'डॉक्टर जी' मध्ये डॉ उदय गुप्ताची भूमिका साकारत आहेत. 'बधाई हो' फेम अभिनेता आयुष्मान खुराना सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे. असं असलं तरी, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पात्रांसाठी त्याची ओळख आहे. 'द फॅमिली मॅन' चे अभिनेता शरिब हाश्मी यांनी या फोटोवर कमेंट करत लिहिले आहे, 'मस्त डॉक्टर रे बाबा..'(Ayushmann Khurrana shared the first look of Doctor G)

'डॉक्टर जी' बद्दल आयुष्मान खुरानाचे मत

आयुष्मान खुराना 'डॉक्टर जी' बद्दल सांगतात, 'डॉक्टर जी' माझ्या अगदी जवळ आहे. लॉकडाउनवरील निर्बंध लक्षात घेऊन आम्ही सर्वजण चित्रपटाच्या शूटिंगची वाट पाहत होतो आणि शेवटी तो दिवस आला याचा आम्हाला आनंद झाला आहे. पडद्यावर पहिल्यांदा डॉक्टरांचे चित्रण करणे हा एक सन्मान आहे. चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ करण्यास मी खूप उत्साही आहे, कारण यामुळे मला विद्यार्थी आणि वसतिगृह आयुष्य जगण्याची आठवण पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळते. आयुष्मान खुराना या फोटोमध्ये स्त्रीरोगशास्त्र औषधी पुस्तक हातात घेताना दिसत आहे.

'डॉक्टर जी' हे 'बरेली की बर्फी' आणि 'बधाई हो' या दोन यशस्वी चित्रपटांनंतर आयुष्मान खुराना आणि जंगल पिक्चर्समधील तिसरा सहकार्य आहे. आयुष्मान आणि रकुल प्रीत सिंह पहिल्यांदा 'डॉक्टर जी'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसतील. अनुभूती कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे. चित्रपटाचे लेखन सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

SCROLL FOR NEXT