ब्रह्मास्त्र
ब्रह्मास्त्र Dainik Gomantak
मनोरंजन

रॉकस्टारचे 'ब्रह्मास्त्र' लवकरच सिनेरसीकांच्या भेटीला!

दैनिक गोमन्तक

अयान मुखर्जीचा (Ayan Mukherjee) 'ब्रह्मास्त्र' चित्रपट इंडस्ट्रीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अयानने रणबीर कपूरचा चाहत्यांनी न पाहिलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये रॉकस्टार रणबीर आगीच्या दिशेने पाहत आहे अश्या दृश्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत अयानने The Time Feels Right या कॅप्शन लिहिले आहे. दिड वर्षापुर्वी चित्रपटासंबधीत प्रवास सुरु झाला होता, साथीच्या रोगामुळे काही दिवस सारे जग ठप्प झाले होते. या सगळ्यातून ब्रह्मास्त्रचे शुटींग रोज चालू आहे. सर्वांचे प्रेम आणि समर्पण आवश्यक आहे. आता योग्य वेळ आहे. ब्रह्मास्त्रासोबत काहीतरी शेअर करण्याची वेळ आली आहे. आम्ही लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करू शकतो.

या प्रकल्पाशी निगडित एका सूत्राने सांगितले की, 'ब्रह्मास्त्र' पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपटाची रिलीज डेट गणेश विसर्जनाच्या आसपास असेल असे सांगण्यात आले आहे. निर्माते चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेची योजना आखत आहेत. त्यांनी सांगितले की ते काही आठवड्यांत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करू शकतात.

'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, अक्किनेनी नागार्जुन, डिंपल कपाडिया प्रमुख भूमिका असणार आहेत. ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी सतत चित्रपटाशी संबंधित चाहत्यांनी न पाहिलेले फोटो शेअर करताना दिसतो. या फोटोत आलिया, रणबीर आणि अयान एकत्र बसलेले दिसत आहेत. या चित्रपटात अमिताभ पहिल्यांदाच आलिया आणि रणबीरसोबत दिसून येणार आहेत.

चित्रपटाचा काही भाग इस्रायलमधील तेल अवीव येथे शूट करण्यात आला आहे. प्रीतमने चित्रपटाला संगीत दिले आहे. कोरोनामुळे हा चित्रपट तीन भागात बनवण्यात आला आहे. 2018 मध्ये या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली होती, परंतु मधल्या काळात तो अनेक वेळा थांबवावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मंत्री सुभाष फळदेसाई यांना धमकी देणाऱ्याला रिवण येथून अटक

Fighter Jet Attack Simulation: गोव्यात UFO? मध्‍यरात्री कानठळ्या, हृदयात धडकी भरवणाऱ्या आवाजचे रहस्य काय?

SSC Result 2024 : ‘हेडगेवार’ची १००% निकालाची परंपरा कायम

Crime News : शेकडाे मजुरांची पडताळणी; खून प्रकरणानंतर मोपात सतर्कता

Margao Accident : कणकवली येथे कार उलटून मडगावातील सात प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT