निक जोनस आता बॉलीवुडमध्ये एंट्री करणार का?
निक जोनस आता बॉलीवुडमध्ये एंट्री करणार का? Dainik Gomantak

निक जोनस बॉलीवुडमध्ये?

निकला (Nick) भारतीय (India) गाण्यांची आवड आहे असे त्याने एक मुलाखतीमध्ये (Interview) सांगितले आहेत.
Published on

बॉलीवूडची (Bollywood) देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)आपल्या अभिनयाची जादू हॉलीवूडमध्ये (Hollywood) दाखवत असताना तिचा पती निक जोनास (Nick Jonas) बॉलीवूडमध्ये एंट्री (Entry) करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एका मुलाखतीत (Interview) निक बॉलीवूडविषयी (Bollywood) भरभरून बोलला.

एवढंच नाही तर त्याच्या बोलण्यातून तो लवकरच बॉलीवूडमध्ये (Bollywood) एंट्री करणार असल्याचं दिसतंय. निक म्हणतो, ‘माझं लग्न प्रियांकासोबत झाल्यापासून मी बरीच भारतीय गाणी ऐकली... चित्रपट पाहिले.मी भारतातच (India) लग्न केलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी भारतात गेलो तेव्हा बॉलीवूडमधील (Bollywood) अनेक मंडळींना भेटलो.

निक जोनस आता बॉलीवुडमध्ये एंट्री करणार का?
काजोल ट्विंकलच 'या' विषयावरती एक मत!

त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. ते सगळेच मला प्रोत्साहित करत होते.’ निक (Nick) पुढे म्हणाला, ‘आमच्या घरी पार्टी असली की आम्ही बॉलीवूडची गाणी (Song) लावतो. तिथल्या गाण्यांसाठी माझ्याकडे एकच शब्द आहे तो म्हणजे, अभूतपूर्व... मला अशा अप्रतिम चित्रपटसृष्टीत (Movie) काम करायला नक्कीच आवडेल. चांगली ऑफर मिळाली तर मी नक्कीच काम करेन.’ साहजिकच निक (Nick) आता बॉलीवूडमध्ये (Bollywood) दिसल्यास नवल वाटायला नको.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com