Auro Mein Kaha Dum Tha? Dainik Gomantak
मनोरंजन

Auro Mein Kaha Dum Tha? : तब्बूच्या या आगामी चित्रपटाचे शुटींग पूर्ण, नाव ऐकुन खूप हसाल...

अभिनेत्री तब्बूचा औरो मे कहा दम था हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री तब्बूने नुकतेच आपल्या औरों मे कहा दम था? या चित्रपटाचे शूटींग पुर्ण केले आहे. 90 च्या दशकात हिट चित्रपट म्हणुन चर्चेत राहिलेल्या अजय देवगनच्या दिलवाले या चित्रपटातल्या एका शायरीत "औरों मे कहा दम था" ही लाईन होती.

याच नावाचा एक चित्रपट येतोय आणि त्याचं शूटींगही पूर्ण झाले आहे याचं तब्बूच्या चाहत्यांना प्रचंड आश्चर्य वाटत आहे. या चित्रपटात तब्बूसोबत अजय देवगनही दिसणार आहे.

तब्बूने नुकत्याच इन्स्टावर शेअर केलेल्या एका फोटोत दोघे एकत्र दिसत आहेत. अजय आणि तब्बू मरीन ड्राइव्हच्या पार्श्वभूमीवर एकत्र उभे असताना नीरज पांडेशी संभाषण करताना दिसत आहेत.

'औरों में कहाँ दम था' ही 20 वर्षांची एक अनोखी संगीतमय प्रेमकथा आहे. हा चित्रपट अजयचा तब्बूसोबतचा दहावा चित्रपट आहे. या जोडीने 'विजयपथ', 'हकीकत', 'ठक', 'फितूर', 'दृश्यम', 'गोलमाल अगेन', 'दे दे प्यार दे', या चित्रपटांमध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. 'दृश्यम 2' आणि 'भोला' हे दोघांचे अलीकडे बॉक्स ऑफिसवर धमाल करणारे चित्रपट ठरले आहेत.

दिग्दर्शक नीरज पांडे 'अ वेन्सडे', 'स्पेशल 26', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'बेबी' आणि 'अय्यारी' सारख्या काही समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता त्यांच्या या चित्रपटाबाबत चाहत्यांना मात्र मोठी उत्सुकता लागुन राहिली आहे.

अजय देवगन आणि तब्बु यांच्यातली 90 च्या दशकापासुन केमिस्ट्री प्रेक्षकांकडून नेहमीच पसंत केली आहेच पण त्याचबरोबर दोघांची चांगली मैत्रीही आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत हे नक्की. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT