Attempts to state the state of mind of each mother  Dainik Gomantak
मनोरंजन

प्रत्‍येक आईच्या मनाची स्थिती मांडण्याचा प्रयत्न

ट्वेंटी फर्स्ट टिफिन’चे दिग्दर्शक विजयगिरी बावा : इंडियन पॅनोरमात एकमेव गुजराती सिनेमा

दैनिक गोमन्तक

पणजी: आपल्या समाजात आजही घरातील स्त्रीला महत्त्वाचे स्थान दिले जात नाही. मग ती आई असो, बहीण असो किंवा पत्नी. ‘ती’ समाजव्यवस्थेत नेहमीच दुय्यम राहते. तिच्यासाठी कोणीही चार चांगले शब्द जाहीरपणे उच्चारत नाही. अशा वेळेला सतत घरात, घरातील व्यक्तींसोबत राहिल्यानंतरही ती स्वतःच्या मनात कुठेतरी नेहमीच एकटी राहत असते. ‘ट्वेंटी फर्स्ट टिफिन’मध्ये आम्ही अशाच एका आईची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या या प्रयत्नांना IFFI च्या माध्यमातून जगासमोर आणता येत आहे, ही आम्हा सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, असे या सिनेमाचे दिग्दर्शक विजयगिरी बावा यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

दोन वर्षांपूर्वी ‘हेलोरो’ सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर आणि त्यानंतर इफ्फीसह विविध जागतिक सिनेमहोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आता नवे युवा दिग्दर्शक आशयघन आणि ‘फेस्टिवल’ सिनेमाच्या वाटेला जाताना दिसत आहेत. विजयगिरी बावा या अशापैंकीच एक.

कथा अशी..

गुजरातमधील एका शहरात राहणाऱ्या एका आईची ही गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा ही गोष्ट जगातील कोणत्याही आईची आहे, जी आयुष्यभर आपल्या घरासाठी राबत असते. एका अनाहूत टप्प्यावर तिच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते जी तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. तिच्यातील स्वत्व जागवते, असे विजयगिरी सांगतात.

आज पाहता येईल सिनेमा

‘युनेस्को’ आयएफसीटी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला आणि इंडियन पॅनोरामामध्ये निवड झालेला ‘ट्वेन्टी फर्स्ट टिफिन’ हा गाजत असलेला गुजराती सिनेमा आज (सोमवारी) आयनॉक्स-१ मध्ये संध्याकाळी ५ वाजता दाखवण्यात येणार आहे.

या सिनेमात मी नीलम यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. आईमध्ये होत गेलेले बदल पाहतानाच त्या दोघींच्या नात्यामध्ये होत गेलेले सकारात्मक बदल आणि मुलीला परिस्‍थितीची होत गेलेली जाणीव यात माझ्या माध्यमातून दिसून येते.

- नेत्री, कलाकार, ‘ट्वेटी फर्स्ट टिफिन’

इतरांच्या सुखासाठी आपल्या सुखावर पाणी टाकणाऱ्या आईची भूमिका मी यात केली आहे. पण प्रोत्साहनाचे शब्द ऐकायला मिळतात, तेव्हा ती आयुष्याकडे कशी वेगळ्या नजरेतून पाहते.

- नीलम पांचाळ, कलाकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Fishing: जप्त केलेल्या गोव्याच्या त्या 2 ट्रॉलर्सचा ताबा महाराष्ट्राकडेच! 'एलईडी मासेमारी' खपवून घेणार नाही, मंत्री नितेश राणेंची कडक भूमिका

Man Falls in Well: कारापूर वाठारांत बांयत पडील्ल्या तरणाट्याक वाचोवपाक उजो पालोवपी दळाक येस

Crime News: आईसोबत प्रियकराला बघितलं, त्याची सटकली, दोघांचीही गळा दाबून केली हत्या; मृतदेह पिकअपमधून नेले पोलिस ठाण्यात

Delhi Police Arrest 3 Terrorists: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई, 'ISI'शी संबंधित 3 दहशतवाद्यांना अटक

Shivaji Maharaj Goa History: शिवरायांची स्वारी ठरली, पोर्तुगीज सैन्य पळून गेले; महाराज सैन्यासह डिचोली येथे मुक्कामाला गेले..

SCROLL FOR NEXT