आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करा सिनेनिर्मिती: अनुराग ठाकूर

आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवात इंडियन पॅनोरमाचे उद्‌घाटन
Make movies with modern technology
Make movies with modern technology Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तंत्रज्ञानाच्या उत्तम वापराने भारतीय सिनेमा (Movies) जगभरात पोहचू शकतो व त्यामुळे आधुकनिकतेचा वापर व्हावा, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी व्‍यक्त केले. इंडियन पॅनोरमाचे उद्‌घाटन केल्‍यानंतर ते बोलत होते. यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

तुम्ही सर्वांनी देशाच्या कानाकोपऱ्यांतून कथा आणण्यासाठी संघर्ष आणि प्रयत्न केला आहे. जर तुम्ही योग्य आशय घेऊन सिनेमा तयार केला असेल तर तो केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल. अगोदर सिनेमहोत्सवांमध्ये फक्त अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाच पुरस्कार दिला जात होता. पण आता तंत्रज्ञ तसेच पडद्यामागील लोकांचाही सन्मान करण्‍यात येतो, ज्यांच्या कामामुळे चित्रपट पूर्ण होतो, असे ठाकूर यांनी स्‍पष्‍ट केले.

Make movies with modern technology
उदयोन्मुख दिग्दर्शकांना आपल्या कथानकाबद्दल हवा ठाम विश्वास

फीचर फिल्म विभागात उद्घाटनाचा चित्रपट असलेला सेमखोर हा IFFI च्या भारतीय पॅनोरामामध्ये प्रदर्शित होणारा दिमासा भाषेतील हा पहिलाच चित्रपट आहे. ऐमी बरुआ, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका असून, त्यांनी या सन्मानाबद्दल इफ्फीचे आभार मानले आहेत.

सेमखोर हा चित्रपट, सामाजिकदृष्ट्या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयांवर चर्चा करणारा असून, या चित्रपटाच्या माध्यमातून, आपण आसाममधील दिमासा समुदायाला कराव्या लागणाऱ्या संघर्षांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ऐमी बरुआ यांनी सांगितले. तुमच्‍या-आमच्‍यात विपुल प्रतिभा आहे. आणि या प्रतिभेच्‍या तसेच सर्वांच्या मदतीने आम्ही इफ्फीला नवीन उंचीवर नेऊ. आज आपण इफ्फीसाठी ज्या पायाभूत सुविधा पाहत आहोत, त्या माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळे निर्माण झालेल्‍या आहेत. इफ्‍फीत त्‍यांचे सदाच स्‍मरण होईल.

- अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री

मी काही चित्रपट समीक्षक नाही किंवा चित्रपटांचा खूप चाहताही नाही. मात्र भारतीय पॅनोरामा विभाग नेहमीच बघतो. त्यातून आपल्या समाजाचे प्रतिबिंब जाणवते. भारतीय चित्रपटांतून आपल्या समाजाचे प्रतिबिंब अत्यंत अप्रतिम पद्धतीने मांडले जाते. समाजाच्या आकांक्षा, गरजा आणि संघर्षही मांडला जातो.

- राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल-हिमाचल प्रदेश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com