Aryan Khan Dainik Gomantak
मनोरंजन

आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबर पर्यंत वाढ

आर्यनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 30 ऑक्टोबर पर्यंत वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण आर्यन खान प्रकरणामुळे चांगलंच ढवळून निघत असताना आता आर्यनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 30 ऑक्टोबर पर्यंत वाढ झाली आहे. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यनचा जामीन अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलला जात होता. 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी जामीन अर्जावरील आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर, न्यायालयाने दसऱ्याच्या सुटीनंतर 20 ऑक्टोबर रोजी जामीन अर्जावर निकाल देण्याचे सांगितले होते. आज यावर निर्णय आला आणि आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

आर्यन खानचा जामीन फेटाळला, त्याला आणखी रात्री तुरुंगात काढाव्या लागतील

आर्यन खान 2 ऑक्टोबरच्या रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने बॅलार्ड पियरच्या ग्रीन गेटवरून क्रूझ कार्डिलावर पकडला, जेव्हा तो आपल्या मित्रांसह मुंबईहून गोव्याला पार्टीला जात होता. 12 तासांच्या चौकशीनंतर आर्यन खानला इतर सात आरोपींसह अटक करण्यात आली. त्याच दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. येथे आर्यनला 4 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी मिळाली. 4 ऑक्टोबर रोजी, आर्यनला पुन्हा किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले जेथे आर्यन आणि इतरांना न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवले. यानंतर, 7 ऑक्टोबर रोजी आर्यन तिसऱ्यांदा न्यायालयात हजर झाला जिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी आर्यनला एनसीबीने वैद्यकीय उपचार करून आर्थर रोड जेलमध्ये हलवले. आर्यन खान 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आर्थर रोड कारागृहाच्या क्वारंटाईन बॅरेकमध्ये राहिला. 14 ऑक्टोबर रोजी आर्यन खानचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला सामान्य बॅरेकमध्ये हलवण्यात आले. आज आर्यनला सत्र न्यायालयातून जामीन मिळाला आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आर्यन तुरुंगातून बाहेर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

चौकार-षटकारांचा पाऊस, 'पॉवर हिटर' किरण नवगिरेनं रचला इतिहास; टी-20 मध्ये झळकावलं सर्वात जलद शतक

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT