Shah Rukh Khan & Aryan Khan Dainik Gomantak
मनोरंजन

आर्यन खानची छवी टिपायला गेले अन्...

दैनिक गोमन्तक

सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) आज आर्थर रोड तुरुंगामधून (Arthur Road Prison) सुटका झाल्यानंतर तुरुंगाबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली. दरम्यान गर्दीमधून तब्बल दहा मोबाईल फोन चोरीला गेले. मुंबई ड्रग्ज प्रकरणी तुरुंगातून तीन आठवड्यांनंतर सुटका झालेल्या आर्यन खानच्या स्वागतासाठी तुरुंग आणि मन्नतच्या बाहेर मोठा जमाव जमला होता. आर्यन खान घरी पोहोचताच पोस्टर आणि फलक हाती असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी सर्व वयोगटातील चाहते, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अगदी वृद्ध जोडप्यांनी आर्यनच्या घरवापसीचा आनंद साजरा करण्यासाठी SRK च्या घराबाहेर हजेरी लावली. मन्नतच्या प्रवेशद्वारापर्यंतची गल्ली गर्दीने खचाखच भरलेली होती. आर्यनची कार सुरळीत चालण्यासाठी पोलीस आणि शाहरुख खानच्या खाजगी सुरक्षेला हा परिसर मोकळा करावा लागला.

दरम्यान, शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) अनेक चित्रपटांमध्ये सह कलाकार म्हणून भूमिका साकारलेली अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) आर्यन खानची (Aryan Khan) आज तुरुंगातून सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने आर्यनचा जामीन भरला. यावेळी कोर्टाने एक लाख रुपयांचा जामीन अर्ज मंजूर केला. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात जिथे आर्यनने 22 दिवस घालवले होते, तिथे सुटकेची कागदपत्रे पाठवण्यासाठी कोर्टासाठी ही प्रक्रिया आवश्यक होती. विशेष म्हणजे, जुही अनेक चित्रपटांमध्ये आर्यनच्या वडिलांची म्हणजेच शाहरुख खानची सहकलाकार राहिली आहे. या दोघांच्या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. नंतर ते दोघेही आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे सह-मालक बनले. आर्यन खान आणि जुही चावलाची मुलगी जान्हवी नुकतेच आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावात एकत्र दिसले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोव्यात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची आता खैर नाही, थेट वाहन जप्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Goa Accidents: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच! चार अपघातांमध्ये सातजण जखमी

Bicholim PirachiKond: अखेर ‘पिराचीकोंड’ झोपडपट्टी जमीनदोस्त! पोलिस फौजफाट्याच्या उपस्थितीत कारवाई

St Estevam Accident: पोलिसांचे पुन्हा 'सांतइस्तेव खाडीत' शोध कार्य! युवतीच्या जबाबात मात्र बराच गोंधळ

सत्तरीच्या बंटी - बबलीचा आणखी एक पराक्रम, दोडामार्गमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली एकाला 15 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT