Aryan Khan- Nora Fatehi  Daiinik Gomantak
मनोरंजन

Aryan Khan- Nora Fatehi : आर्यन खान आणि नोरा फतेही एकमेकांच्या प्रेमात? दुबईत दिसले एकत्र

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि नोरा फतेही अलीकडे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाल्याच्या बातम्या येतायत

Rahul sadolikar

बी टाऊन मधुन कधी काय बातमी समोर येईल सांगणं मुश्कील असतं. कधी कुणाचं जुळेल आणि कधी कुणाचं तुटेल हे सांगता येत नाही.

सध्या अभिनेता शाहरुख खान आणि कुसू कुसू गर्ल नोरा फतेही यांच्यात सध्या जवळीक असल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडीयावर होत आहेत. दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत ज्यात ते एकत्र फिरताना दिसतात.

दुबईत झालेल्या एका पार्टीचे फोटो व्हायरल झाल्याने दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान, सुहाना खान आणि करन जोहर दुबईतल्या एका पार्टीत दिसले, त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. एका फोटोत नोरासोबत दिसणारी एक महिला दुसऱ्या एका फोटोत आर्यन खान सोबत दिसते.

साहजिकच दोघे एकत्र आहेत हे स्पष्ट होतं. इतकंच नाही तर यानंतर दोघांचे डिनर करत असताना काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

हे फोटो व्हायरल होताच नेटिझन्सना मनोरंजनाला एक विषयच मिळाला. फोटोवरच्या एकेक कमेंटस बघुन तुम्हाला हसु आवरणार नाही. काही नेटीझन्स म्हणतात आता अनन्याचं काय? ती तर एकटी पडली.

काही जणांनी नोराची तर आता मजा आहे अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे तर आणखी एकाने ही तर तैमुरसोबत लग्न करणार होती ना? पण आर्यन खान योग्य आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मिडीयावरच्या या कमेट्स एकदा नोरा फतेही आणि आर्यन खानने जरुर वाचायला हव्यात निदान त्यांना कळेल तरी कि त्यांचे फॅन्स त्यांची किती काळजी करतायत ते ?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT