Arijit Singh Song, Arijit Singh Ek Din Song Dainik Gomantak
मनोरंजन

Arijit Singh Ek Din Song: 'अरिजीत सिंग इज बॅक'! नवीन गाणे घालते आहे धुमाकूळ; आमिर खानने भेटून केला चमत्कार Watch Video

Arijit Singh Song: आमिर खान प्रोडक्शनच्या ‘एक दिन’ या चित्रपटातील टायटल ट्रॅक अरिजीत यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आला आहे.

Sameer Panditrao

बॉलीवूडमध्ये सध्या एकासुखद घडामोडीची जोरदार चर्चा रंगली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाणारे आमिर खान अलीकडेच लोकप्रिय गायक अरिजीत सिंह यांच्या मूर्शिदाबाद येथील गावी गेले होते. या भेटीमागे केवळ मैत्री नव्हे, तर एक खास हेतू दडलेला होता—अरिजीत यांनी पुन्हा एकदा प्लेबॅक गायनासाठी तयार व्हावे, हीच आमिर यांची इच्छा होती.

काही दिवसांपूर्वी अरिजीत यांनी प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केल्याची बातमी समोर आली होती. चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. ही बातमी समजताच आमिर खान थेट त्यांच्या घरी पोहोचले. दोघांनी एकत्र संपूर्ण शहर फिरत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भेटीत आमिर यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी अरिजीत यांना गाण्याची विनंती केली आणि अखेर त्यांनी होकार दिला.

आमिर खान प्रोडक्शनच्या ‘एक दिन’ या चित्रपटातील टायटल ट्रॅक अरिजीत यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आला आहे. नुकताच या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक व्हिडिओ निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये अरिजीत मन लावून गाताना दिसतात, तर समोर बसलेले आमिर त्यांचे गायन एकाग्रतेने ऐकत आहेत. हा क्षण चाहत्यांसाठी एखाद्या सरप्राइझपेक्षा कमी नव्हता.

‘एक दिन’ हा एक रोमँटिक चित्रपट असून त्यात साई पल्लवी आणि जुनैद खान प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले आहे. निर्मितीची धुरा आमिर खान, मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मुर्शिदाबादमध्ये फिरताना अरिजीत यांनी आमिर यांना आपले बालपणाचे कोपरे दाखवले. निरोप घेताना आमिर भावूक झाल्याचेही दिसले. मात्र, अरिजीत पुढे नियमित प्लेबॅक गायन करतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तरीही ‘एक दिन’च्या निमित्ताने चाहत्यांना त्यांचा जादुई आवाज पुन्हा ऐकायला मिळणार, हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT