Virat Kohali Anushka Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Anushka Sharma : अनुष्काला वारंवार मिसेस कोहली म्हटल्याने चाहते भडकले म्हणाले....

अभिनेत्री अनुष्का शर्माचे चाहते एका गोष्टीवर चांगलेच भडकले आहेत......

Rahul sadolikar

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे कपल देशातल्या काही क्यूट कपलपैकी एक आहे. सोशल मिडीयावर सतत अॅक्टिव्ह असणारं आणि सतत चर्चेत असणारं हे कपल आहे. आता हे कपल पुन्हा चर्चेत आले आहे.

गुरुवारी पती विराट कोहलीसह इंडियन स्पोर्ट्स ऑनर्समध्ये जबरदस्त हजेरी लावल्यानंतर, अनुष्का शर्माने शुक्रवारी मुंबईतील आणखी एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी मात्र ती एकटीच पोहोचली.

अनुष्का शर्मा एका बॉलिवूड अवॉर्ड फंक्शनमध्ये एका सुंदर ड्रेसमध्ये पापाराझींसाठी पोज देताना दिसली होती. या कार्यक्रमासाठी अनुष्काने काळ्या रंगाचा टेलर केलेला ड्रेस घातला होता आणि तो बुल्गारीच्या नेकलेससोबत जोडला होता. 

ती रेड कार्पेटवर पोहोचताच फोटोग्राफर्सनी तिचे नाव ओरडून तिला 'मिसेस कोहली' म्हणायला सुरुवात केली. यावर अनुष्काच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अनुष्का शर्मा अवॉर्ड फंक्शनला येताच पापाराझींच्या बोलण्यावर आणि त्यांच्या वागण्यावर हसली आणि म्हणाली - आराम करा! तुम्ही सगळे का ओरडताय? थांबा! माझे कान थकले आहेत… कालपासून मला रडणे आवरता आले नाही. 

जेव्हा फोटोग्राफर्सनी सांगितले की त्यांना अशा कार्यक्रमांमध्ये तिची आठवण येते तेव्हा ती हसली आणि 'मेरे कान बज रहे है' म्हणाली. तसेच इव्हेंटमध्ये अनुष्काने वरुण धवन आणि क्रिती सेनॉनची रेड कार्पेटवर भेट घेतली. तिघांनीही एकत्र पोज दिली आणि अनुष्काने क्रितीला घट्ट मिठीही दिली.

या कार्यक्रमात अनुष्का आणि विराट कोहली एका परफेक्ट कपलसारखे दिसत होते. विराटने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता तर अनुष्काने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या कार्यक्रमात त्याने रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, अंगद बेदी-नेहा धुपिया यांचीही भेट घेतली. 

मात्र, या फंक्शनमध्ये जेव्हा पापाराझी अनुष्काला मिसेस कोहली म्हणत ओरडत होते, तेव्हा चाहत्यांना ते आवडले नाही आणि तिचेही स्वतःचे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. अनुष्का जरी विराटची पत्नी असली तरी तीला स्वत:ची ओळख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT