Anil Kapoor's Instagram Post : "माझी पत्नी माझ्यासाठी मोठा आशीर्वाद" अनिल कपूरकडून पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता अनिल कपूरने आपल्या पत्नीला इन्स्टाग्रामवर अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत
Anil Kapoor Latest News
Anil Kapoor Latest NewsDainik Gomantak


बॉलिवूडचा झकास अभिनेता आपल्या पत्नीसाठी इन्स्टाग्रामवर चांगलाच भावनिक झालेला दिसला. अनिल कपूरने आपल्या पत्नीला सर्वात मोठा आशीर्वाद म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय रिअल-लाइफ जोडींपैकी एक, अनिल आणि सुनीता या तरुण स्टार जोडप्यांसाठी एवढ्या वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमाने राहतायत. आणि म्हणुनच त्यांना एक यशस्वी आणि क्यूट कपल म्हटलं जातं

1984 मध्ये लग्न करणारी प्रतिष्ठित जोडी, अनिल आणि सुनीता अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या रोमँटिक शेनॅनिगन्सने नेटिझन्सना वेड लावतात. सुनिता कपूर या पूर्वी कॉस्च्युम डिझायनर होत्या आणि आता तीन हुशार मुलांची आई, सोनम, रिया आणि हर्षवर्धन कपूर, अनिलची प्रेमळ पत्नी म्हणुनही त्यांनी आपली भूमीका प्रामाणिकपणे पार पाडली आहे.

आपल्या प्रेमळ पत्नीच्या वाढदिवसानिमित्त, बॉलीवूडचा 'झकास' अभिनेता, अनिल कपूर नॉस्टॅल्जिक झाला आणि त्याने पत्नी सुनीता यांच्यासह त्याच्या अलीकडील आणि जुने फोटो टाकले आहेत आणि पोस्टसोबत एक हृदयस्पर्शी नोट लिहिली.

त्याच्या 'सर्वात मोठ्या आशीर्वादाला' वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, अनिल कपूरने लिहिले, "माझा सर्वात मोठा आशीर्वाद आज जन्माला आला...माझी सुंदर पत्नी! सुनीता, तुझ्यासोबतचे जीवन हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते.

एक स्वप्न ज्यासाठी मी भाग्यवान आहे प्रत्येक दिवस जगण्यासाठी पुरेसा आहे! माझे स्वप्न आणि माझा स्वप्नातील जोडीदार/मित्र/पत्नी/मुलगी असल्याबद्दल धन्यवाद, सदैव आणि सदैव... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिये!! @kapoor.sunita".

पत्नी सुनिता यांना 'माझे स्वप्न आणि माझे स्वप्नातील जोडीदार' असं म्हणत अनिलने ब्लॅक हार्ट इमोजीने नोट संपवली. बर्थडे गर्ल, सुनीताने देखील अनिलच्या वाढदिवसाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि अनिलच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक रेड हार्ट इमोजी टाकल्या आहेत.

"हॅपिनेस ऑलवेज", अशी कमेंट अनिल कपूरचा 'राम लखनचा' सह-कलाकार आणि त्याचा सर्वात जुना मित्र, जॅकी श्रॉफने, लाल हार्ट इमोजीसह केली आहे. 

Anil Kapoor Latest News
Ajay Devgn On Natu Natu : "नाटू नाटू ला ऑस्कर माझ्यामुळे मिळाला !" अजय देवगन असं का म्हणाला?

"हॅप्पी हॅप्पी बर्थडे डिअर @kapoor.sunita", अभिनेता चंकी पांडे याने केक आणि गॉगलच्या इमोजीसह शुभेच्छा दिल्या. 

अनिलचा भाऊ, संजय कपूरची पत्नी, महीप कपूर यांनी लाल हार्ट इमोजीसह शुभेच्छा दिली आहे. दरम्यान, वर्कफ्रंटवर, अनिल कपूर अलीकडेच अॅक्शन थ्रिलर मालिका 'द नाईट मॅनेजर' मध्ये आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला सोबत दिसला होता. आता त्याच्याकडे सिद्धार्थ आनंदचा आगामी एरियल अॅक्शन थ्रिलर 'फाइटर' आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com