Anushka Sharma Sister Dainik Gomantak
मनोरंजन

"ताई, जीजूंचा नंबर द्या" इंस्टाग्राम ट्रेंडमुळे अनुष्काच्या बहिणीची गोची; विराट फॅन्सनी केलं हैराण Watch Video

Instagram Trend: सध्या सोशल मीडियावर एक नवीन आणि मनोरंजक ट्रेंड वेगानं व्हायरल होत आहे, ज्यात सामान्य लोकं प्रसिद्ध सेलिब्रिटींशी आपले नातेसंबंध असल्याचा दावा करतात

Akshata Chhatre

मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक नवीन आणि मनोरंजक ट्रेंड वेगानं व्हायरल होत आहे, ज्यात सामान्य लोकं प्रसिद्ध सेलिब्रिटींशी आपले नातेसंबंध असल्याचा दावा करताना दिसत आहेत. holyfknairball किंवा holyfcknairball या नावाने व्हायरल झालेल्या या ट्रेंडमध्ये अनेक युझर्सनी आपण अनुष्का शर्मा, मलायका अरोरा आणि माधुरी दीक्षितयांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींचे नातेवाईक असल्याचा दावा केला आहे. यापैकी अनुष्का शर्माची बहीण अनेकांचं लक्ष वेधून घेतेय.

'मी अनुष्का शर्माची बहीण आहे!'

एका तरुण इन्स्टाग्राम युझरने आपण अनुष्का शर्माची बहीण असल्याचा दावा केला. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्येएकानं लिहिलं,"इसका जिजू विराट कोहली है आणि त्यावर तिने "हां" असे उत्तर दिलंय. या व्हिडिओला विराट कोहलीशी संबंधित अनेक मजेदार कमेंट्स मिळतायत.

एका व्यक्तीने लिहिलंय, "विराट भाई का फोन नं. दे दो." दुसऱ्याने , "जर ती त्यांच्या 'कुटुंबातील' असेल, तर ते तिला फॉलो का करत नाहीत? असा प्रश्न केलाय, तर एकाने "फेक उतना ही जितन की लपेट सको" अशी थेट प्रतिक्रिया दिलीये.

काही विराट कोहलीचे चाहते किमान विराट कोहलीचा ऑटोग्राफ दे म्हणतायत, तर काहींना विराट कोहलीचा नंबर हवा आहे.

या सोशल मीडियाच्या चर्चेत काही धोनीचे चाहते देखील असून ते कोहलीला ओळखत असलीस तर धोनीला भेटवशील का? असा प्रश्न विचारतायत.

प्रकरणाचा खुलासा

अनेक कमेंट्सनंतर, त्या इन्स्टाग्राम युझरने तिने 'रील'मध्ये केवळ विनोद केल्याचं स्पष्ट केलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनीही अनुष्का शर्माचे नातेवाईक असल्याबद्दल असेच व्हिडिओ बनवले. या व्हायरल ट्रेंडमध्ये इतर अनेक तरुण इन्स्टाग्रामर्सनी मलायका अरोरा आणि माधुरी दीक्षित यांसारख्या सेलिब्रिटींशी संबंधित असल्याचा दावा करणारे व्हिडिओ बनवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT