Akshata Chhatre
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी कुणाला आवडत नाही? विराट आणि अनुष्का यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
लोकं या जोडीकडे आदर्श जोडी म्हणून बघतात. सध्या सगळीकडेच घटस्फोट वाढतायत आणि अशात अनुष्का शर्माने वाढणाऱ्या घटस्फोटांवर चर्चा केली.
अनुष्का शर्माने इंडिया टुडेच्या एका मुलाखतीत वाढत्या घटस्फोटांवर मत मांडलं होतं. काय म्हणतेय मिसेस कोहली जाणून घेऊया..
ती म्हणाली सध्या लग्नाचं समीकरण बदललं आहे, महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत आणि त्यांना तसाच जोडीदार देखील हवाय.
महिलांची विचारसरणी बदलली आहे. त्यांना कुठल्याही दबावाखाली जगायचं नाही तर त्यांच्या पार्टनरसोबत पुढे जायचं आहे.
एकदा लग्न झालं की त्यावर काम केलं पाहिजे. लोकं पट्कन गोष्टी सोडून देतात आणि म्हणून घटस्फोट वाढत आहेत.