Virat Kohli - Anushka Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Virat-Anushka: 'ती आयुष्यात आली अन्...' विराटचे अनुष्काबद्दल मोठे वक्तव्य

Virat-Anushka: हे आपल्याला आपल्या वाढीच्या काळात शिकवले जात नाही.

दैनिक गोमन्तक

Virat-Anushka: क्रिकेटर आणि मनोरंजन सृष्टीतील कलाकार हे अनेकविध कारणांनी अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातल्या अनेक बाबींमुळे ते नेहमी चर्चांचा भाग बनतात.

आता अशीच एक जोडी चाहत्यांची प्रचंड लाडकी आहे. प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी पुन्हा एकदा चर्चांचा भाग बनली आहे.

एका मुलाखतीदरम्यान, विराट कोहलीने अनुष्काबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. विराट म्हणतो- माझ्या वीशीच्या मध्यापर्य़ंत मी फार वेगळा होतो. मात्र अनुष्का जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोणच बदलून गेला.

आपण फार विविध पद्धतीने आयुष्य जगू शकतो ही जाणीव मला अनुष्कामुळे झाली. माझ्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत. जेव्हा मी तिच्याबरोबर गप्पा मारतो तेव्हा मला समजते की स्रिया कशाप्रकारे विचार करतात, त्या या जगाकडे कशा पद्धतीने बघतात आणि त्यातून मला स्रियांच्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो असेही विराट कोहलीने म्हटले आहे.

विराटने पुढे भर देत म्हटले आहे की, एक जोडीदार म्हणून तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे व्यक्तीमत्व, त्याचे काम, त्याच स्वभाव, त्याची ओळख स्विकारावी लागते. हे आपल्याला आपल्या वाढीच्या काळात शिकवले जात नाही.

दरम्यान, विराट-अनुष्का( Anushka Sharma ) ची जोडी प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. ते दोघे नेहमीच एकमेकांना सपोर्ट करताना दिसून येतात. याबरोबरच, विराट( Virat Kohli )-अनुष्का एकमेकांचे कौतुक करतानादेखील दिसून येतात. ते उत्तम जोडप्याचे उदाहरण असल्याचे अनेकदा नेटकऱ्यांकडून म्हटले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: हॉटेल, रेल्वे, रस्ते... सर्वत्र ट्रॅकिंग! गोव्यात 'चोरांचा माग' काढण्यासाठी 'रियल-टाईम' प्रणाली आवश्यक

125 वर्षांची कोकणी कला लंडनमध्ये! वर्षा उसगावकर यांनी सादर केलं 'तियात्र'; Video Viral

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

Goa Beach Wedding: परवानगी नसताना घातला मांडव, बीच वेडिंगच्या नादात 1 लाखांचा दंड, गोव्यात घडला अजब प्रकार; वाचा

'अवामी लीग'ला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र! हसीनांच्या मृत्युदंडामागे राजकीय सूड? - संपादकीय

SCROLL FOR NEXT