Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Animal: 'ॲनिमल'च्या सिक्वेलबद्दल रणबीर कपूरचे मोठे वक्तव्य

Animal: आता भाग एकच्या यशामुळे तेही करण्याचा आत्मविश्वास त्याच्यात आहे.

दैनिक गोमन्तक

Animal: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'एनिमल' हा 2023 मधील सर्वात मोठा चित्रपट आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही विक्रम केले आहेत . या चित्रपटाचा सीक्वल 'ॲनिमल पार्क' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता रणबीरने एका नव्या मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने खुलासा केला की 'ॲनिमल'ची कथा बनवताना अनेकांना माहिती नव्हती.

रणबीर कपूर म्हणाला की त्याला बॉबी देओलच्या कथेबद्दल काहीच माहिती नाही. अनिल कपूरला वडील आणि मुलाची कथा माहित आहे. पण संदीप रेड्डी वंगा त्याच्या स्क्रिप्टबद्दल खूप गुप्त होते. 'ॲनिमल पार्क'बद्दल रणबीर म्हणाला, 'एक-दोन सीन तयार आहेत, जे त्याने मला कथन केले आणि ते खूपच रोमांचक आहेत. आता भाग एकच्या यशामुळे तोही करण्याचा आत्मविश्वास त्याच्यात आहे. पुढचा भाग अधिक गडद आणि भयानक असू शकतो. तो काहीही करू शकतो.

अॅनिमल चित्रपटामुळे वाईट गोष्टीबाबत बोलण्याची सुरुवात केली आहे. जर कोणत्या गोष्टी चूकीच्या आहेत आणि त्या चूकीच्या आहेत असे दाखवले गेले नाही आणि समाजात त्याबद्दल बोलले जात नसेल तोपर्यंत त्याच्याबद्दल जाणीव होत नाही. अॅनिमलमुळे याची सुरुवात झाल्याचे रणबीरने म्हटले आहे.

'ॲनिमल'चे दिग्दर्शन संदीप वांगा रेड्डी यांनी केले असून यात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, शक्ती कपूर आणि सुरेश ओबेरॉय यांच्या भूमिका आहेत. तो 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'शी टक्कर झाली. असे असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, 'ॲनिमल' आता नेटफ्लिक्सवर रिलिज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राहुल गांधींची 'जादूगार' टीपण्णी अन् भाजपचा पलटवार, लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले; राजनाथ सिंहांची माफीची मागणी

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

SCROLL FOR NEXT