Anil Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Anil Kapoor : "अनिल तू स्टार बनु शकत नाहीस" दिग्दर्शक मनमोहन देसाई असं का म्हणाले होते?

तु स्टार बनु शकत नाहीस असं दिग्दर्शक मनमोहन देसाई अनिल कपुर यांना का म्हणाले होते ?

Rahul sadolikar

अभिनेते अनिल कपुर आजही त्याच ताकदीने इंडस्ट्रीत काम करतात जशी त्यांनी सुरवात केली होती. कलात्मक चित्रपटासोबतच त्यांनी व्यावसायिक चित्रपटांतूनसुद्धा उल्लेखनीय भूमीका केल्या आहेत.

'मशाल' चित्रपटात अनिल कपूर यांची दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत अभिनयाची उत्कष्ट जुगलबंदी बघायला मिळाली. पण अनिल कपुर यांना बॉलिवूडच्या एका दिग्गज दिग्दर्शकाने एक सल्ला दिला होता . कोण होते हे दिग्दर्शक आणि त्यांनी काय सल्ला दिला होता? चला पाहुया

80 च्या दशकात तेव्हा अनिल कपूर हळूहळू आपला जम बसवत होते. त्याच काळात संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही इंडस्ट्रीत आले होते. नुकतेच अनिल कपूर यांचे 'वो सात दिन', 'मशाल' हे चित्रपट सुपरहिट ठरले होते.

आता अनिल कपूर यांना दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्यासोबत काम करायचे होते. कारण अमिताभ बच्चन यांच्यासारखे महान कलाकार मनमोहन देसाई यांच्यासोबत काम करत होते.त्यामुळे साहजिकच अनिल कपूर यांना मनमोहन देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची ईच्छा झाली.

जेव्हा मनमोहन देसाई यांच्यासोबत अनिल कपूर यांचं बोलणं झालं तेव्हा मनमोहन देसाई यांनी अनिल कपूर यांना एक सल्ला दिला होता. ते म्हणाले कि मिशा असलेला अभिनेता स्टार नाही होऊ शकत. तू एक उत्तम अभिनेता बनु शकतोस पण एक स्टार नाही बनु शकत. अनुपम खेर होस्ट करत असलेल्या एका फेमस शो मध्ये ही माहिती स्वत: अनिल कपूर यांनी दिली होती.

पण आज अनिल कपूर यांनी सगळ्या प्रकारच्या चित्रपटात काम करुन आपण अष्टपैलू अभिनेते असल्याचं दाखवुन दिलं. त्यांचं स्टारडम आजही टिकुन असल्याचं आपण बघु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT